Nepal Bus Accident | नेपाळमध्ये बस दरीत कोसळल्याने महाराष्ट्रातील 14 प्रवाश्यांचा मृत्यू; 31 जण जखमी
ऑनलाइन टीम – Nepal Bus Accident | नेपाळ मधील पोखराहून काठमांडूच्या दिशेने निघालेली प्रवासी बस नदी पात्रात कोसळल्याने 14 प्रवाशांचा मृत्यू झाला तर, 31 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्व प्रवाशी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. जखमींमधील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील एकूण ११० भाविक तीन बसमधून तीर्थयात्रेसाठी नेपाळला गेले होते. बस पोखराहून काठमांडूला जात होत्या. यावेळी यूपी एफटी ७६२३ हा क्रमांक असलेली बस नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत कोसळली. सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. नदीत पडल्यानंतर ती बस तरंगत नदीच्या काठावर आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस कार्यालय तनहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी दिली आहे.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, अपघातग्रस्त बसमधून १५-१६ जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. नेपाळ दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात असून पर्यटकांची माहिती मिळाल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जाईल. पुनर्वसन विभागाचे अधिकारी हे जळगाव जिल्हाधिकारी, उत्तर प्रदेश मदत आयुक्त (रिलीफ कमिश्नर) यांच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच नदीत बस पडल्याने बचावकार्य आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
या घटनेचा व्हिडिओचा समोर आला आहे. व्हिडिओमध्ये बसचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं दिसत आहे. बस कोसळली त्यावेळी नदीतील पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याचं पाहायला मिळतं.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा