New Police Stations In Pune | पुणे : काळेपडळ, आंबेगाव, बाणेर, वाघोली, नांदेड सिटी, फुरसुंगी, खराडी ही नवीन पोलिस स्टेशन उद्यापासून कार्यान्वित होणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवारी) उद्घाटन
पुणे : New Police Stations In Pune | पुणे शहर पोलीस आयुक्तालयात ७ नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्यास शासनाने मान्यता देणारी अधिसूचना आज काढली आहे. या पोलीस ठाण्यांचा औपचारिक उद्घाटन समारंभ उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी २ वाजता पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे. (Pune Police News)
https://www.instagram.com/p/DA8XlQGJpCD
येत्या २ दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने नविन पोलीस ठाणी निर्मितीला काही दिवसांपूर्वीच मान्यता देण्यात आली होती. त्याकरीता पदनिर्मिती व त्याअनुषंगाने येणार्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली होती. त्या पाठोपाठ आज त्या बाबतची अधिसूचना काढण्यात आली. पाठोपाठ उद्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
https://www.instagram.com/p/DA8RujVJ0yp
हडपसर, वानवडी, कोंढवा या पोलीस ठाण्यांचे विभाजन करुन काळेपडळ पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे विभाजन करुन आंबेगाव पोलीस ठाणे, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे विभाजन करुन बाणेर पोलीस ठाणे, लोणीकंद पोलीस ठाण्याचे विभाजन करुन वाघोली पोलीस ठाणे, सिंहगड पोलीस ठाण्याचे विभाजन करुन नांदेड सिटी पोलीस ठाणे, लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्याचे विभाजन करुन फुरसुंगी पोलीस ठाणे, चंदननगर व लोणीकंद पोलीस ठाण्याचे विभाजन करुन खराडी पोलीस ठाणे अशी ७ नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
https://www.instagram.com/p/DA8EswHp786
त्यासाठी विविध संवर्गातील ८०९ नियमित पदे निर्माण करण्यास व ७ सफाई कामगार ही पदे घेण्यास व त्या करीता येणार्या ५९ कोटी ४५ लाख १६ हजार १२० रुपयांच्या आवर्ती खर्चास व ५ कोटी ४४ लाख ५७ हजार रुपये इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DA8CBweC3wO
याबरोबरच पुणे शहर पोलीस आयुक्तालयासाठी नवीन २८८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकामी ४३३़४४ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. पोलीस आयुक्तालया नवीन इमारतीचे उभारणीकरीता प्रशासकीय मान्यतेसह निधी रक्कम १९३ कोटी रुपये बंडगार्डन पोलीस ठाण्याकरीता नवीन इमारतीचे उभारणीकरीता प्रशासकीय मान्यतेसह निधी २१ कोटी रुपये या विविध प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. (New Police Stations In Pune)
https://www.instagram.com/p/DA7mV1zJcoU
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण