Pankaja Munde On Dhananjay Munde | ‘धनंजय मुंडेंना परळीतून आमदार करणारच, हिशोब केल्याशिवाय राहणार नाही’, दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा इशारा; म्हणाल्या – ‘आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही?’

बीड: Pankaja Munde On Dhananjay Munde | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर भगवान भक्ती गडावरील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या मेळाव्यात धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. (Parli Assembly Constituency)
https://www.instagram.com/p/DBA_AD5pSJg
“तुम्हाला वाटतं का माझा पराभव झाल्यामुळे मी थकले आहे. पण मी सांगते घोडा मैदान लांब नाही. धनजय मुंडे यांना परळीतून आमदार करणारच आहोत. पण राज्यातील कानाकोपऱ्यात आमच्या लोकांना कुठेही त्रास दिला, वंचितांना, पिडीतांना दलितांना गरिबांना त्रास दिला तर त्याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातून दिला आहे. “मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू”, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, “मला गोपीनाथ मुंडे यांनी वारसा दिला. गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावरून शेवटंचं वाक्य म्हटलं होतं की, मला गडावरून दिल्ली आणि मुंबई नाही तर पंकजा मुंडे दिसते.
https://www.instagram.com/p/DBBAn7giAlj/?img_index=1
त्यामधून मला त्यांनी एक संदेश दिला. मला जीवनात काही निर्माण करता आलं नाही. पण मी एक भगवान भक्तीगड उभा केला. गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेला शब्द मी पूर्ण करून दाखवला. मला येथील जनता जास्त प्रिय आहे. माझ्यावर ज्यावेळी जीएसटीची रेड पडली होती, त्यावेळी या सर्व लोकांनी १२ कोटी रुपये जमा केले होते. माझ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला होता तेव्हा या लोकांनी जीव दिला. येथील सर्व लोकांवर मी माझ्या लेकरांपेक्षा जास्त जीव लावते. मी कुणालाही घाबरत नाही. मी उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही”, असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले.
https://www.instagram.com/p/DBA4OSeJXKv
त्या पुढे म्हणाल्या, ” मी दसरा मेळाव्याला दरवर्षी आल्यानंतर तुम्हा सर्वांना साष्टांग नमस्कार घालते.
मी तुम्हाला साष्टांग नमस्कार का घालते? कारण माझ्या वडिलांनी तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकली.
मी वियजी झाल्यावर तुम्ही मला मोठा मान दिला.
पण माझा पराभव झाल्यानंतरही तुम्ही मला त्याहीपेक्षा जास्त मान दिला. आता तुम्हा सर्वांना मान देण्यासाठी मी प्रत्येक गावागावात आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही?, या मंचावर अठरा पगड जातीचे लोक आहेत. या ठिकाणी सर्व धर्माचे लोक आले आहेत”, असेही पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे.
https://www.instagram.com/p/DBA2jpoJCg3
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार