Pimpri Chinchwad Police | पिंपरीत वाहतूक कोंडीचे 26 पॉइंटस ! पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली माहिती, उपाय योजना करण्यास सुरुवात
पिंपरी : Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवडकरांना गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा (Traffic Jam In Pimpri) मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Vinoy Kumar Choubey) यांनी नागरिकांशी भेट संवाद साधण्यासाठी व्हर्च्युअल टाऊन हॉलचे आयोजन केले होते. त्यात नागरिकांचे सर्वाधिक प्रश्न हे वाहतूक कोंडी विषयी होते.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले की, वाहतूक शाखा, पीसीएमसी, पीडब्ल्यु डी आणि राष्ट्रीय महामार्ग यांनी एकत्रितपणे अभ्यास करुन २६ वाहतूक कोंडीचे पॉइंटस निश्चित केले आहे. तेथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी त्यावर उपाय योजना करण्यास सुरुवात केली गेली आहे. चाकणमध्ये तळेगाव चौक आणि आळंदी फाटा यासह ११ ठिकाणांवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. हिंजवडी, विप्रो सर्कल आणि राधा चौक यासारख्या प्रमुख भागांचा आढावा घेतला जात आहे. रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियमन उपाय योजना सुरु असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
चौबे यांच्या या अनोख्या उपक्रमाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. शाळांमधील विद्यार्थांच्या सुरक्षेच्या बाबतीत नागरिकांनी मुद्दे उपस्थित केले. त्यात सीसीटीव्ही देखरेख, शालेय कर्मचायांची चारित्र्य पडताळणी, पॉक्सो मार्गदर्शक तत्वांचे प्रशिक्षण आणि सुरक्षा रक्षकांची उपस्थिती या मुद्दांवर चर्चा करण्यात आली.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी डिसेबर २०२३ मध्ये सुरु केलेल्या ‘‘वन डे फार स्कूल’’ या उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमामध्ये ३०० हून अधिक शाळा आणि ६५ हजार विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच बाबत प्रशिक्षित करण्यात आले. तसेच पॉक्सो मार्गदर्शक तत्वांवर चर्चा करण्यात आली. शाळांना सीसीटीव्ही बसविण्याची, कर्मचार्यांची अनिवार्य पोलीस पडताळणी करण्याचे आवाहन केले. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेट्या ठेवण्याची आणि विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यास सांगितले.
नागरिकांनी विद्यार्थ्यांसाठी पॉक्सो मार्गदर्शक तत्वे व माहितीपर सत्र आयोजित करण्याची नागरिकांनी मागणी केली. पोलीस अधिकारी व अंमलदार हे सर्व शाळांमध्ये प्रशिक्षण व माहिती देण्यासाठी उपलब्ध आहे. त्याबाबत शाळांनी 9529691966 यावर संपर्क साधावा, असे आयुक्तांनी सांगितले.
सायबर गुन्ह्यातील अडीच कोटी रुपये पीडितांना परत
पिंपरी चिंचवड पोलिसांनी या वर्षी आतापर्यंत २१६ सायबर गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यात ७२ जणांना अटक केली आहे. २कोटी ५० लाख रुपयांवरुन अधिक रक्कम पीडितांना परत करण्यात आली आहे. तसेच २७ कोटींची रक्कम होल्ड/लिन करण्यात आलेली आहे. नागरिकांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलद्वारे किंवा १९३० या क्रमांकावर कॉल करुन तत्काळ सायबर फसवणुकीची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी शांतता समित्यांच्या बैठका,
गणपती मंडळे आणि इतर सरकारी विभागांसोबत बैठका आयोजित करुन समन्वय साधला आहे.
संपूर्ण उत्सव काळात वाहतूक व्यवस्थापनाकडे पोलिसांचे विशेष लक्ष असेल.
सणाच्या काळात ध्वनी प्रदुषणाशी संबंधित आदेश/मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकानां करण्यात आले.
मंडळांसाठी एक खिडकी योजना
पिंपरी चिंचवड पोलीस आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी गणेश मंडळांना परवाने सुलभतेने मिळण्यासाठी क खिडकी प्रणाली सुरु केली आहे.
तसेच विसर्जन मार्गाचे विश्लेषण करुन ३० ठिकाणी वाहतूक वळविण्याचे नियोजन केले असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.
या व्हर्च्युअल टाऊन हॉल सत्राला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि रात्री एका तासाचे नियोजन असताना ते एक तासाने वाढवावे लागले.
नागरिकांना त्यांच्या समस्या, निरीक्षणे आणि सूचना मांडण्याची संधी मिळाली. (Pimpri Chinchwad Police)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा