Police Vijay Koli Suicide | तीन दिवसांपासून बेपत्ता पोलीस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
पुणे: Police Vijay Koli Suicide | पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना पिंपरी-चिंचवड शहरातील ट्रान्सपोर्ट नगर भागातील पीएमपीएमएल बस डेपोमध्ये घडली. मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव विजय कोळी असे आहे. आज सकाळी त्यांचा मृतदेह पीएमपीएमएल बस डेपो परिसरात आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून विजय कोळी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
