Porsche Car Accident Pune | अपघात प्रकरणात आरोपीला निबंध लिहायला सांगणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई
पुणे: Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरघाव वेगात पोर्शे कार चालवून अश्विनी कोस्टा व अनिश अवधिया या दोघांना चिरडलं होतं. ही घटना घडल्यानंतर तातडीने मुलाला अटक करण्यात आली होती.
https://www.instagram.com/p/DA7x4zvpCfZ
त्यानंतर आरोपीला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगत अन्य अटी घालत जामीन मंजूर केला होता. यानंतर समाजमाध्यमातून आणि राज्यातून मोठा संताप पाहायला मिळाला. दरम्यान आता याप्रकरणी शिक्षा सुनावणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DA71QCJpZ4P
आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून राज्य सरकारने बाल न्याय मंडळाच्या दोन राज्य-नियुक्त सदस्यांची हकालपट्टी केली आहे.
https://www.instagram.com/p/DA742QEJvWD
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण