Prithviraj Chavan On Badlapur School Girl Incident Case | ‘बदलापूर प्रकरणात कायदा सुव्यवस्था बिघडली’, पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात, म्हणाले – ” राजकीय कार्यकर्त्यांमुळे प्रकरण दाबण्याचं काम केलं जातंय”

Prithviraj Chavan

मुंबई : Prithviraj Chavan On Badlapur School Girl Incident Case | बदलापूरमध्ये दोन लहानग्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक देण्यात आली आहे. बदलापूर प्रकरणावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

“राज्यात संतापाची लाट आहे. बदलापूर येथील प्रकरण गंभीर आहे. राजकीय कार्यकर्त्यांमुळे प्रकरण दाबण्याचं काम केलं जातंय. कारवाई दडपण्याचं काम केलं म्हणून नाराजी आहे. कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे”, असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जाड चामडीचं सरकार आहे. प्रकरण दाबण्याचा काम केलं जातंय असं म्हणत फडणवीसांच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली.

बदलापूर प्रकरणात कायदा सुव्यवस्था कोलमडली असून कारवाई दडपण्याचे काम केले जात असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मुख्यमंत्री म्हणतात, आरोपीला फासावर लटकवू, मात्र, तो तुमचा अधिकार नाही. ही शाळा राजकीय विचारांची आहे. त्यामुळं हे प्रकरण दाबण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

आमची हाक सरकारपर्यंत जात नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
प्रकरण दडवण्याचा प्रयत्न केला जात असून आरोपीला शिक्षा व्हायला हवी.
या प्रकरणात निकम चांगले वकील आहेत मात्र लोकांना विश्वास हवा,
कुटुंबाची हरकत नसेल तर हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असेही चव्हाण म्हणाले. (Prithviraj Chavan On Badlapur School Girl Incident Case)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”, शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या