Pune ACB Trap Case | लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई ! प्रांताधिकारी गोविंद शिंदे याला 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
पुणे : Pune ACB Trap Case | लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंचर येथे मोठी कारवाई केली आहे. बिल्डिंग कम्प्लेशन सर्टिफिकेट देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून प्रांताधिकारी गोंविद शिंदे याला रंगेहाथ पकडले.
जुन्नर, आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) म्हणून गोविंद शिंदे कार्यरत आहेत. एका इमारतीच्या बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी त्यांच्या कार्यालयात तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यासाठी त्याला शिंदे याने २ लाख रुपयांची लाच मागितली. त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी मंचर येथील गोविंद शिंदे याच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २ लाख रुपये घेताना पकडण्यात आले. मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
