Pune Crime News | भोंदूबाबाकडून महिलेला जाळ्यात ओढून लैंगिक शोषण; आरोपीवर गुन्हा दाखल (Video)

Pune Crime News | Pune Police arrests Bhondubaba Rishikesh Vaidya; Manjari Police arrests him in Pimpri area

पुणे : Pune Crime News | पुण्यातील एका ३५ वर्षीय महिलेवर स्वतःला धर्मगुरू म्हणवणाऱ्या व्यक्तीकडून अध्यात्माच्या नावाखाली लैंगिक शोषण झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी ऋषिकेश वैद्य (रा. वसई) याने महिलेच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत तिला आपल्या जाळ्यात ओढले.

https://www.instagram.com/reel/DWYTIk_idl4/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

“मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस,” असे सांगत त्याने विश्वास संपादन केला. २०२३ मध्ये फेसबुकद्वारे ओळख झाल्यानंतर आरोपीने तिला पुण्यात भेटण्यास बोलावले. मांजरी येथील एका लॉजमध्ये नेऊन गुंगीकारक पदार्थ देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेलही केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अशा घटनांमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.

You may have missed