Pune ACB Trap Case | वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी लाच घेणारा महावितरणाचा प्रशिक्षणार्थी जाळ्यात

पुणे : Pune ACB Trap Case | नवीन खरेदी केलेल्या फ्लॅटच्या पूर्वीच्या मालकाचे नाव बदलून नवीन नाव लावण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणाच्या प्रशिक्षणार्थीला (Trainee of Mahavitran) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. (Pune Bribe Case)
आशिष ज्ञानोबा क्षीरसागर Ashish Dyanoba Kshirsagar (वय २५) असे या प्रशिक्षणार्थीचे नाव असून तो महावितरणच्या धनकवडी उपविभाग (Mahavitran Dhankawadi Su Division Office) कार्यालयात कार्यरत आहे.
तक्रारदार यांनी त्यांचे आईच्या नावावर एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटच्या लाईट बिलावरील पूर्वीच्या मालकाचे नाव बदलून त्यांच्या आईचे नाव लावण्यासाठी आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे महावितरणच्या ऑनलाईन साईटवर अपलोड करुन देण्यासाठी आशिष क्षीरसागर याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १४ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी त्याच दिवशी करण्यात आली. त्यात क्षीरसागर याने ८०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर मंगळवारी धनकवडी येथील महावितरण उपविभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ८०० रुपये स्वीकारताना क्षीरसागर याला पकडण्यात आले. सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (Shirish Sardeshpande), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे (PI Prasad Lonare) अधिक तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध