Pune Crime Branch News | रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
पुणे : Pune Crime Branch News | सण, उत्सव काळात हत्यारे बाळगणारे, शस्त्र पुरविणाऱ्या गुन्हेगारांकडे लक्ष ठेवून कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी दिले होते. त्याअनुषंगाने माहिती काढून खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pune) एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून देशी कट्टा व २ जिवंत काडतुसे जप्त केली. (Pune Crime Branch News)
अझर रमजान सय्यद Azhar Ramzan Syyad (वय २३, रा. म्हसोबा मंदिर, भवानी पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
खंडणी विरोधी पथक माहिती काढत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व पवन भोसले यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार काशेवाडी येथील मिरा हॉस्पिटल शेजारील रोडवर पोलिसांनी सापळा रचून अझर सय्यद याला पकडले. त्याच्या ताब्यातून एक देशी कट्टा व २ जिवंत काडतुसे असा २१ हजार रुपयांचा माल जप्त केला.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस अंमलदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, पवन भोसले, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, दिलीप गोरे, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, चेतन शिरोळकर, अमोल घावटे, अनिल कुसाळकर, गणेश खरात, किशोर बर्गे, चेतन आपटे, आदिनाथ येडे, आशा कोळेकर यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा