Pune Crime Branch News | अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात पकडले 14 लाखांचे मॅफेड्रोन; दोघांना केली अटक

पुणे : Pune Crime Branch News | विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगणार्या दोघांना पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने १४ लाख रुपयांचे मॅफेड्रोन (MD Drug) जप्त केले आहेत. (Anti-Narcotics Cell Pune)
https://www.instagram.com/p/DAcxXzNJqtS
जहीर ऊर्फ साद गनी खान (वय २०), आदनाना शाबीर शेख (वय २५, दोघे रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड (PI Sudarshan Gaikwad) व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत होते.
https://www.instagram.com/p/DAczJOtJDbk
यावेळी पोलीस अंमलदार अझिम शेख यांना बातमी मिळाली की, कोंढव्यातील ओपेल फलक सोसायटी समोर दोघे जण अंमली पदार्थ विक्रीसाठी आले आहेत. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी सकाळी तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून १४ लाख रुपयांचे ६३ ग्रॅम मॅफेड्रोन (एम डी) जप्त करण्यात आले आहेत.
https://www.instagram.com/p/DAbaFCPJsX8
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त निखील पिंगळे (DCP Nikhil Pingle), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (ACP Rajendra Mulik) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक (API Nitinkumar Naik), पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), पोलीस अंमलदार अझिम शेख, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, दिशा खेवलकर, साहिल शेख, संदिप शेळके, योगेश मांढरे, अझिम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, आझाद पाटील यांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/DAbAVC8pREH
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’