Pune Crime News | मुलीचे अश्लील व्हिडीओ बनवून केले व्हायरल, पुण्यातील तरुणाला मुंबईतून अटक
पुणे / रत्नागिरी : Pune Crime News | मुलीला वारंवार मेसेज पाठवून, व्हिडीओ कॉल करुन तिचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या पुण्यातील तरुणाला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी (Ratnagiri Police) मुंबईतून अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने त्याचा शोध घेऊन मुंबईतील चेंबूर (Chembur Mumbai) येथील देवनार (Deonar) परिसरातून त्याला अटक केली.
दशरथ सिद्धराम गायकवाड उर्फ वनराज आश्विन देशमुख Dashrath Siddaram Gaikwad Alias Vanraj Ashwin Deshmukh
(वय- 32, रा. संतोष नगर, पाण्याचे टाकीजवळ, शनिमंदिर समोर, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात (Ratnagiri Gramin Police Station) फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी (7 जुलै) भारतीय न्याय संहिता 500, 504, 506 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (इ), 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ गायकवाड हा मुलीला सोशल मीडियावर त्याच्या वेगवेगळ्या अकाउंटवरुन चॅटींग करत होता. तसेच मुलीला वारंवार व्हिडीओ कॉल करुन तिचे अश्लील फोटो काढले. मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन, तसेच अनेकांना पाठवून मुलीची बदनामी करत होत. त्याने मुलीला, तिचे वडील व भावाला शिवीगाळही केली होती. याबाबत गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दशरथ गायकवाड फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याचा शोध घेत असताना तो मुंबईतील चेंबूर येथील देवनार परिसरात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.
त्यानुसार पथकाने चेंबूर येथे त्याचा शोध घेऊन अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. मोबाईलची तापसणी केली असता आरोपीने इतर अनेक मुलींशीही सोशल मीडियावर चॅटिंग केल्याचे दिसून आले. तसेच त्या मुलींना व्हिडीओ कॉल करुन त्यांचे अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वैभव मोरे, भैरवनाथ सवाईराम, मंदार मोहिते, उमेश गायकवाड यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड