Pune Crime News | पत्रकार परिषद घेऊन सामाजिक शोषण करुन मानसिक त्रास दिल्याच्या आरोपावरुन माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Pune Crime News | Atrocity case registered against former corporator Vasant More on charges of social exploitation and mental harassment by holding a press conference

पुणे : Pune Crime News |  जांभुळवाडी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाणीवपूर्वक व हेतूपुरस्कर बोलून तसेच फेसबुक पेज, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर व्हायरल करुन सामाजिक शोषण करुन कुटुंबाला मानसिक त्रास दिल्याच्या आरोपावरुन माजी नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे Vasant Krishnaji More (रा. कात्रज गावठाण) यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय ७२, रा. संतोषी माता मंदिराजवळ, कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे महानगर पालिका नवीन इमारतीत २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांनी जांभुळवाडी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पत्रकार व इतर उपस्थितांसमोर विश्वनाथ लहाडे हे अनुसुचित जातीचे आहेत, हे माहिती असताना देखील जाणीवपूर्वक व हेतुपुरस्कर लहाडे इतका दारु पिला होता की त्याला बोलता देखील येत नव्हते. ओढ्यामध्ये उतरुन गटारे साफ करत आहे, असे वक्तव्य जाणीवपूर्वक फेसबुक पेज, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर व्हायरल केले. फिर्यादी यांनी त्यानंतर वसंत मोरे यांना फोन करुन विचारणा केली होती. त्यावेळीही त्यांनी फिर्यादी यांना मानसिक त्रास दिला. फिर्यादी यांचे सामाजिक शोषण करुन कुटुंबाला मानसिक त्रास दिला व घरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

You may have missed