Pune Crime News | ‘तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात’ म्हणत पोर्टर डिलिव्हरी बॉयने तरुणीचा हात धरुन केला विनयभंग, शिवाजीनगर पोलिसांनी केले गजाआड

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पाणी मागण्याचा बहाणा करुन तरुणीचा हात पकडून ‘‘तुम्ही दिसायला खुप सुंदर आहात’’ असे म्हणून दुचाकीवरुन आलेल्या पोर्टर डिलिव्हरी बॉयने विनयभंग केला. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

श्रीधर हरीभाऊ कांबळे Sridhar Haribhau Kamble (वय २७, रा. शुक्रवार पेठ, मुळ रा. कराड) असे पोर्टर डिलिव्हरी बॉयचं नाव आहे.

याबाबत एका ३० वर्षाच्या  तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शिवाजीनगर गावठाणात शुक्रवारी ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधर कांबळे हा दुचाकीवरुन शिवाजीनगर गावठाण येथे आला होता. फिर्यादी यांना डिलिव्हरी दिल्यानंतर त्याने त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्या पाणी देत असतानाच त्याने उजवा हात पकडून ‘‘तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात,’’ असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यामुळे या तरुणीने आरडाओरडा केला. तेव्हा तो पळून गेला. या  तरुणीने शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर ट्रेस करुन त्याला अटक केली. श्रीधर कांबळे हा मुळचा कराडला राहणारा असून सध्या तो शुक्रवार पेठेत राहतो. सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास करीत आहेत.

You may have missed