Pune Crime News | पुणे : जेवणाच्या कारणावरुन डोक्यात हातोडा मारून मजुराचा खून, महंमदवाडी परिसरातील घटना

Murder

पुणे : Kondhwa Pune Crime News | जेवण न आवडल्याने बांधकाम मजुराला हातोड्याने मारहाण करुन खून केल्याची घटना महंमदवाडी परिसरातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली (Murder In Mohammed Wadi Pune). आरोपीने आणखी एकाच्या डोक्यात हातोडा मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) एकाला अटक केली आहे.

भुवन शास्त्री सरकार (वय 63, रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कमल नारायण मार्डी (वय 49, रा. जियापूर, पश्चिम बंगाल) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103, 118(1), 352 नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याबाबत शक्तीमंडल रामप्रित मंडल (वय-21 रा. रहेजा मिलेनियम लेबर कॅम्प, महंमदवाडी, ता. हवेली) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातील रहेजा मिलेनियम लेबरकॅम्प येथे रविवारी (दि.14) दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमदवाडी परिसरात रहेजा मिलेनियम गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. गृहप्रकल्पातील कामगार वसाहतीत सरकार, मार्डी राहायला आहेत. रविवारी दुपारी सरकार याने सहकारी बांधकाम मजुरांसाठी जेवण तयार केले. जेवणाची चव न आवड्याने मार्डी याने सरकारला शिवीगाळ केली. वादातून आरोपीने सरकारच्या डोक्यात शेजारी ठेवलेला हातोडा मारला. सरकारच्या नाकावर हातोडा मारल्याने तो गंभीर झाला.
आरोपीने शेजारी असलेल्या रामप्रीत मंडल यांना हातोड्याने मारहाण केल्याने ते जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
सरकार यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याप्रकरणी रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करुन आरोपी मार्डी याला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड