Pune Crime News | पुणे : आई रागवल्याने शाळकरी मुलीची 13 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, हडपसर भागातील अमानोरा टाउनशिप परिसरातील घटना

Suicide

पुणे : Hadapsar Pune Crime News | आई रागवल्याने एका 14 वर्षीय शाळकरी मुलीने इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन उडीमारुन आत्महत्या (Suicide Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना हडपसर भागातील अमानोरा टाउनशिप (Amanora Park Township) परिसरात बुधवारी दुपारी घडली. एवढ्या लहान वयात किरकोळ कारणावरुन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलगी इयत्ता आठवीमध्ये शिकत होता.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) दिली आहे. अल्पवयीन मुलगी, तिची आई, आठ वर्षांचा भाऊ, मावस भाऊ बुधवारी दुपारी घरी होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आईने मुलीला आईने अभ्यासाला जा असे सांगितले. या कारणावरुन मुलीला राग आला. त्यानंतर तीने 13 व्या मजल्यावरील मोकळ्या जागेतून उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे अल्पवयीन मुलांच्या वागण्यात बदल झाला आहे.
किरकोळ कारणावरुन टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
मुलांना सद्यस्थितीत पालक, शिक्षक याचा धाक राहिलेला नाही, हे अशा घटनांवरुन उघड झाले आहे.
अशा परिस्थितीमध्ये मुलांना समुपदेशनाची गरज आहे अशा प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल

You may have missed