Pune Crime News | पुणे: कंपनीच्या शेअर्स परस्पर विक्री करुन 54 लाखांची फसवणूक, व्यवस्थापकावर FIR
पुणे : Viman Nagar Pune Crime News | कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करत असताना कंपनीच्या शेअर्सची परस्पर विक्री करुन 53 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे (Cheating Fraud Case). याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2024 मध्ये विमानगर येथील मंत्री आय. टी. पार्कमधील (Mantri IT Park) कंपनीत घडला आहे.
याबाबत भालचंद्र मधुसुदन देवधर (वय-49 रा. लावेले कासा, बावधन, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय कोनुरी Dattatraya Konuri (रा. लोकरे हाऊस, सानेगुरुजी सोसायटी, वडगाव शेरी) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या कंपनीत मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करत होता.
कंपनीने आरोपी दत्तात्रय कोनुरी याच्यावर विश्वास ठेवून महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती.
कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करुन आरोपीने कंपनीचा विश्वासघात केला.
आरोपीने कंपनीच्या खात्यातून 53 लाख 90 हजार रुपये किमतीचे शेअर्स स्वत:च्या खात्यावर घेतले.
त्यानंतर त्याची विक्री करुन मिळालेल्या पैशांचा अपहार केला.
हा प्रकार देवधर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तपासणी केली असता हा प्रकार 26 फेब्रुवारी 2024 रोजी घडल्याचे लक्षात आले. त्यांनी सोमवारी (दि.15 जुलै) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (PSI Ravindra Dhaware) करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक