Pune Crime News | पुणे : निलेश घायवळ टोळीतील कुख्यात गुन्हेगार रोहित आखाडेला कोथरुड पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ टोळीतील फरार गुन्हेगार रोहित विठ्ठल आखाडे याला कोथरुड पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याच्यावर तीन मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

https://www.instagram.com/p/DWGhK17ieGS

रोहित विठ्ठल आखाडे Rohit Vitthal Akhade (वय २६, रा. शास्त्रीनगर, कोथरुड) हा गोखलेनगर परिसरात आला असल्याची माहिती पोलीस अंमलदार शकील पठाण यांना मिळाली. या बातमीची खातरजमा करुन कोथरुड पोलिसांनी त्याला अटक केली असल्याचे कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी जामखेड येथे सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करुन त्याला जखमी केले होते. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना सागर मोहोळकर याचा मृत्यु झाला होता. या गुन्ह्यात रोहित आखाडे याचा सहभाग होता. या गुन्ह्यात मोका कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहे. शिवाजीनगर येथील ६० लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्ह्यातही रोहित आखाडे याचा सहभाग होता.
गेल्या वर्षी कोथरुडमध्ये गोळीबार व कोयत्याने वार केल्याच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. तेव्हापासून तो फरार होता. या दोन्ही गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. निलेश घायवळ टोळीचा तो सक्रीय सदस्य होता.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, पो उप निरी मोहन चव्हाण, पोलीस हवालदार शकील पठाण, पो. हवा. संजय दहिभाते, पो हवा श्रीकांत दगडे, पो. शि वैभव शितकाल, पो शि मंगेश शेळके, पो शि ऋषी कोळप आणि पो शि विष्णु राठोड यांनी केली आहे.