Pune Crime News | सोसायटीत न सोडल्याने सुरक्षा रक्षकाला काठीने बेदम मारहाण करुन केले गंभीर जखमी, महंमदवाडी येथील घटना

Pune Crime News | Security guard injures auto-rickshaw driver by hitting him on the head with

पुणे : Pune Crime News |  सोसायटीत येण्यासाठी गेट उघडण्यास नकार दिल्याने दोघांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/DWGtIbkidDU

याबाबत देवानंद कारभारी डोंगरे (वय २६, रा. सिद्धार्थनगर, एन आय बी एम रोड, कोंढवा) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गंगा व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महंमदवाडी येथील गंगा किंग स्टोन सोसायटीत गुरुवारी १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गंगा किंग स्टोन सोसायटीत ड्युटी करत होते. त्यावेळी गंगा व त्याचा मित्र आला़ त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन सोसायटीचे गेट उघड आम्हाला आत यायचे आहे, असे सांगितले. त्यांनी आत जाण्यास नकार दिला. तेव्हा दोघांनी हाताने मारहाण केली. एकाने तेथीलच काठी घेऊन त्यांच्या डोक्यात मागच्या बाजुला मारुन जखमी केले. त्यांच्या मोबाईलचे नुकसान केले. फिर्यादी यांनी डॉ. रऊ सय्यद हेल्थ केअर क्लिनिक येथे उपचार घेतल्यानंतर फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप राऊत तपास करीत आहेत.

You may have missed