Pune Crime News | दहशत निर्माण करण्यासाठी तोडफोड करणार्‍या फरार सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी केले अटक

New Project

पुणे : Pune Crime News | एमपीडीए, मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर जामीनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगारने आपल्या साथीदारासह येरवड्यातील कामराजनगर येथे जुन्या वैमनस्यातून वाहनांची तोडफोड करुन तरुणावर वार करुन दहशत पसरविल्यानंतर जवळपास दोन महिने फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

समीर शब्बीर शेख Sameer Shabbir Shaikh (वय २७, रा. जयजवाननगर, येरवडा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

याबाबत अनिस सिकंदर शेख (वय २८,रा. कामराजनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ७ ऑक्टोंबर रोजी रात्री घडली होती. समीर शेख व त्याचे साथीदार झऊर शेख, आझाद अस्लम खान, मुस्ताफा बेपारी, साहिल नदियाल, सुलतान शेख व त्याच्या दोन मित्रांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन धमकी देऊन लोखंडी शस्त्राने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रिक्षा व इतर वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. हातातील धारदार शस्त्रे हवेत फिरवुन मी इथला भाई आहे, असे म्हणत आरडाओरडा करुन वस्तीमध्ये दहश्त माजविली होती. येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याच्या काही साथीदारांना अटकही केली होती. समीर शेख हा फरार होता.

येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अमोल गायकवाड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, समीर शेख हा लोहगाव भागातील पवार वस्ती येथील मित्राकडे येणार आहे. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे व पोलीस अंमलदार हे तेथे गेले. सापळा रचून समीर शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर शेख याने फिर्यादीबरोबर जुन्या भांडणाच्या रागातून व स्वत:च्या नावाची दहशत करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे सांगितले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार महेंद्र शिंदे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, नटराज सुतार, अतुल जाधव, अक्षय शिंदे, अमोल गायकवाड, संदीप जायभाय यांनी केली आहे.

You may have missed