Pune Crime News | अल्पवयीन मुलीला कोलकात्ताप्रमाणे करेन म्हणणार्या रिक्षाचालकाला अटक
पुणे : Pune Crime News | रिक्षातून एकट्या जाणार्या अल्पवयीन मुलीला कोलकात्ता (Kolkata Doctor Case) येथे काय घडलेल्या प्रकाराप्रमाणे करेन, अशी धमकी देऊन तिचा विनयभंग (Molestation Case) करणार्या नराधम रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
गोविंद हनुमंत नेनावत Govind Hanumant Nenavat (वय २३, रा. सावित्री विहार सोसायटी, मानाजीनगर) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलिसांकडे (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार नवले ब्रीज ते कात्रज (Navale Bridge To Katraj) दरम्यान रिक्षामध्ये बाबजी पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी सकाळी पावणेआठ ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १६ वर्षाची मुुलगी एकटी रिक्षाने नवले ब्रीज ते कात्रज असा प्रवास करत होती. मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन त्याने मुलीला तुला बॉयफ्रेंड आहे का असे बोलून तिचा हात धरला. तेव्हा मुलीने त्याला काय करतोय असे बोलून हात काढून घेतला. तो रिक्षा चालवत असताना तिला बोलला की तुला कोलकात्ता येथे काय प्रकार झालाय माहिती आहे का, असे बोलून त्या घटनेत काय घडले, त्याचे अश्लिल वर्णन करु लागला. त्यानंतर त्याने तू मला खूप आवडतीय, चल आपण लॉजवर जाऊ, असे बोलून पुन्हा तिचा हात धरला व तिचा विनयभंग केला.
या घटनेची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाला बेदम चोप
देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा