Pune District Court To Swargate Metro | ‘उद्या या मार्गावर मेट्रो सुरु न केल्यास…’ काँग्रेसने दिला इशारा; पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्याने राजकारण रंगलं

Pune-Metro

पुणे: Pune District Court To Swargate Metro | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित आजचा पुणे दौरा रद्द झाल्याने राजकारण रंगले आहे (PM Modi’s visit cancelled) . मोदींच्या हस्ते स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे आज उदघाटन करण्यात येणार होते. पाऊस आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने पंतप्रधान मोदींचा नियोजित पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती आहे.

https://www.instagram.com/p/DAXrMhDJ28P

दरम्यान शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्ग आज सुरु झाला नाही तर शुक्रवारी या मार्गाचे औपचारिक उदघाटन जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात येईल. या मार्गावर मेट्रो सुरु न केल्यास मेट्रो अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), माजी शहराध्यक्ष ऍड. अभय छाजेड, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगिता तिवारी आदी उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/DAX6p0bJLYo

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे मेट्रोच्या टप्प्याटप्प्याच्या उद्घाटनाला येत आहेत या कार्यक्रमांमुळे कोट्यावधींचा चुराडा होत आहे. हा कार्यक्रम रद्द झाला असला तरी कोट्यावधींचा चुराडा या दौऱ्याच्या निमित्ताने झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यालयात बसून हे उद्घाटन करता आले असते यापूर्वी देखील त्यांनी अशा प्रकारे उद्घाटन केली आहे.

https://www.instagram.com/p/DAX_Si_Jcu7

आता राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मेट्रो मार्ग नागरिकांसाठी खुला करावा आणि पुन्हा एकदा कार्यक्रम घेऊन लोकांच्या पैशाचा चुराडा करू नये अशी मागणी सरकारकडे धंगेकर यांनी केले आहे.

https://www.instagram.com/p/DAYB2g4C2Ef

मेट्रोमध्ये जे पक्षीय राजकारण सुरू आहे. ते अत्यंत निंदनीय आहे. काँग्रेस पक्षाने मेट्रोचा डीपीआर केला. मेट्रोची सुरुवात देखील काँग्रेसने केली. मात्र कधीही जाहिरात बाजी केली नाही. त्यामुळे आता भाजप सरकारनेही जाहिरातीवर होणारा खर्च टाळावा आणि टप्प्याटप्प्याने उद्घाटनासाठी पंतप्रधानांना न बोलावता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते हे उद्घाटन करावीत, असे धंगेकर यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DAXyHB-pGwI

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed