Pune News | श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त, भवानी प्रतिष्ठानतर्फे सुप्रसिद्ध ‘गोष्ट इथे संपत नाही’ चा प्रयोग
पुणे : Pune News | श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त, भवानी प्रतिष्ठानतर्फे सुप्रसिद्ध ‘गोष्ट इथे संपत नाही’ चा प्रयोग भरत नाट्य मंदिर येथे नागरिकांसाठी शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये सारंग भोईरकर आणि सारंग मांडके या दोघा तरूणांनी कथाकथनाच्या वेगळ्या शैलीतून बाजीराव पेशवे यांचे झंझावाती जीवन चरित्र मांडून उपस्थित पुणेकरांची दाद मिळवली. मुसळदार पाऊस असतांनाही पुणेकरांनी प्रयोगाला प्रचंड गर्दी केली होती.
बाजीराव पेशवेंची गोष्ट सांगतांना सादरकर्त्यांनी लोकांना फारसे परिचित नसणारे बाजीरावांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. छत्रपती शाहू महाराज व बाजीराव पेशवे या राजा-प्रधानाच्या जोडीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वाराज्य सीमा विस्तारण्याचे स्वप्न कशाप्रकारे पूर्ण केले याचे दाखले देत ही गोष्ट सांगितली.
छत्रपती शाहु महाराज व बाजीराव पेशवे यांचा परस्परांवरील प्रेम व जिव्हाळा, महाराणाप्रतापांच्या वारसदारांनी बाजीराव पेशवेंची अनुभवलेली स्वामीनिष्ठा, मिर्जा राजे जयसिंहांच्या वारसदारांकडे दाखवलेली मुत्सदेगिरी, बुंदेलखंडच्या महाराजांची सुटका, मल्हारराव होळकरांची नियुक्ति अशा अनेक प्रसंगातुन मांडके व भोईरकरांनी बाजीरावांचे चरित्र रेखाटले.
या प्रसंगी माजी नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ उपस्थित होत्या. त्यांनी सादरकर्त्यांचे व आयोजकांचे स्वागत करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
राजकीय व आर्थिक फायद्यासाठी इतिहासाचा विपर्यास केला जातो.
सारंग मांडके व सारंग भोईरकर हे दोघं तरूण अशा दुष्कृतीला पायबंद लावण्याचे काम करत
असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश शांडिल्य (तिवारी) म्हणाले. तंत्रज्ञाचा वापर करून खोटे ‘नर्हेटीव्ह’ तयार करणे,
समाजात तेढ निर्माण करणे यासारख्या चूकीच्या बाबींवर सत्य मांडून प्रबोधन करणे हाच उपाय असल्याचे देखील शांडिल्य म्हणाले.
प्रतिष्ठानच्या सौ गौरी मातापुरकर, सौ आरती भिडे, विशाल सुगंधी, गणेश जाधव, मधूर गेहलोत,
निलरत्न कांबळे, सौ प्रिया शांडिल्य व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मा मिलिंदजी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय