Pune News | आर. के. बहुउद्देशीय संस्था, इंद्राणी बालन फाउंडेशन (पुनीत बालन ग्रुप) अणि पुणे पोलिस यांच्या सयुंक्त विद्यमाने शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगींण विकासासाठी समुपदेशनचा उपक्रम संपन्न
पुणे: Pune News | पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाने आर. के. बहुउद्देशीय संस्था, इंद्राणी बालन फाउंडेशन (पुनीत बालन ग्रुप) अणि पुणे पोलिस यांच्या सयुंक्त विद्यमाने पुणे शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगींण विकासासाठी समुपदेशनचा उपक्रम चालू करण्यात आला आहे. आज समाजामधे सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे व व्यसनाधीनतेमुळे मुलांच्या आयुष्यावर व शालेय जीवनावर चुकीचा परिणाम होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलांचे चुकीच्या मार्गाकड़े जाताना प्रमाण वाढतानाव दिसत आहे. तसेच त्यांचा अभ्यासाचा कल कमी होताना दिसत आहे. यासाठी त्या मुलांच्या समस्या जाणुन घेऊन त्यांना योग्य मार्ग दाखाविन्याचे काम या उपक्रमातुन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आज आर. के. बहुउद्देशीय संस्था, इंद्राणी बालन फाउंडेशन अणि पुणे पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी पुणे पोलिस स्कूल, शिवाजीनगर येथील शाळेत माध्यमिक शाळेतील मुलां-मुलींसाठी मोकळा संवाद उपक्रम आयोजित करण्यात आला. ज्यामधे मुलांना समुपदेशनाच्या माध्यमातून समाजातील घडणाऱ्या वाईट गोष्टी, मोबाईल व सोशल मिडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम, व्यसनाधीनता या विषयाबाबत संवाद साधला गेला.
शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ट पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी मुलांना करियर मार्गदर्शन, स्वावलंबन,
निर्भयपणा, आत्मविश्वास व आनंदपूर्ण जीवन जगण्यासाठी कारावयाचे स्वतःमधील बदल, वर्तमानपत्र वाचन,
लेखन अणि संवाद याचे फायदे याबद्दल सांगितले. त्यानंतर भाग्यश्री साळुंके यांनी मुलांना मोबाइलच्या अतिवापराचे दुष्परिणाम,
पालक मित्र शिक्षक अणि नातेवाईक यांच्याशी असणारे मुलांचे सह्संबंध, याबाबत गोष्टीच्या रूपात समजावून सांगितले.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्पिता दिक्षीत, सविता सिंग, शाळेचे इतर शिक्षक,
विद्यार्थी आणि संस्थेच्या वतीने इंदु जोशी अणि शुभम रांजणे उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद