Pune Pimpri Chinchwad Crime News | गुन्ह्याचा पंचनामा करणार्‍या पंचावरच दाखल झाला गुन्हा; काय आहे नेमके प्रकरण, वाचा सविस्तर

Pimpri Police Station

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | एखादा गुन्हा घडला अथवा गुन्हेगार गुन्हा करणार असल्याचे समजल्यावर पोलीस तेथे पंचनामा करण्यासाठी पंचांना घेऊन जातात. ते जे पहातात, त्यानुसार पंचनाम्यावर पंच म्हणून सही करतात. महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये शासकीय कर्मचार्‍यांना पंच म्हणून घ्यावे, जेणे करुन पंच फुटणार नाही आणि खटल्याला बळकटी मिळेल, असा शासनाने आदेश दिला आहे. पण पिंपरीतील एका खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याच्या गुन्ह्यातील पंचावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्याचे (Pimpri Police Station) पोलीस निरीक्षक सुहास सुरेश आव्हाड (PI Suhas Suresh Awhad) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पंच असलेले विठ्ठल हरिदास आव्हाड Vitthal Haridas Awhad (वय ४३, रा. गौतमनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता पिंपरी पोलीस ठाण्यात घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी वाय पाटील हॉस्पिटलजवळ खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा घडला होता. पिंपरी पोलिसांनी जिजामाता हॉस्पिटलमधील दोन सरकारी कर्मचार्‍यांना पंच म्हणून पाठविण्याचे पत्र दिले. त्यानुसार हॉस्पिटलने विठ्ठल आव्हाड व त्यांच्या सहकार्‍यांना पंच म्हणून पाठविले. दोघेही घटनास्थळावर आले. फिर्यादी यांनी पंचांसमोर घटना सांगितली. तेथून काही गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या. ते सर्व पिंपरी पोलीस ठाण्यात पोहचले.

पोलिसांनी पंचनाम्याच्या प्रिंट काढल्या. पंच म्हणून त्यावर सह्या करायला सांगितले.
आव्हाड यांच्या सहकार्‍याने पंच म्हणून सह्या केल्या.
पण, इतका वेळ पंच म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली असताना सह्या करायला सांगितल्यावर
अचानक विठ्ठल आव्हाड यांनी मला कोर्ट कचेरीत अडकवू नका,
मी कोर्टात साक्षीला जाणार नाही. या पंचनाम्यांवर सह्या करणार नाही, अशी भूमिका घेतली.
त्यावर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी त्यांना समजावून सांगितले. तुम्हाला कोर्टात यावे लागणार नाही.
तुमच्या कार्यालयाने पंच म्हणून काम करण्याचा लेखी आदेश दिला आहे.

सरकारी कामात मदत करणे कायद्याने बंधनकारक आहे, हे सर्व समजावून सांगितले. तरीही त्यांनी जुमानले नाही. पोलीस चार पाच दिवस त्यांना समजावून सांगत होते. तरीही त्यांनी न मानल्याने शेवटी पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार घटनास्थळ पंचनाम्यावर सही करण्यास नकार दिल्याने सरकारी कामात मदत करणे टाळल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सोनमाळी तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed