Pune Pimpri Chinchwad Crime News | गणपती वर्गणी गोळा करण्यावरुन कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; टोळक्याने रिक्षाचालकाला केले जबर जखमी
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | गणपतीची वर्गणी गोळा करीत असताना आमच्या भागात वर्गणी गोळा करायची नाही, या कारणावरुन टोळक्याने रिक्षाचालकावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)
या घटनेत फिर्यादी रिक्षाचालक महेश प्रदिप गुणेवाड (वय २१, रा. पाटीलनगर, चिखली) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार चिखली पोलिसांनी प्रज्वल रोकडे, मानव रोकडे, ओम नरवडे, यश नरवडे (सर्व रा. रोकडे वस्ती, चिखली) यांच्यासह त्यांच्या ३ ते ४ साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चिखलीमधील रोकडे वस्तीत बुधवारी रात्री साडेसात वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे साथीदारांसह गणपतीची वर्गणी मागत रोकडे वस्तीत गेले होते. (Attempt To Kill)
त्यावेळी टोळक्याने हातात कोयते, काठ्या, हॉकी स्टीक, लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी व साथीदारांजवळ आले. त्यावेळी तेथील दुकानदारांनी दुकाने बंद केली. फिर्यादी हे सोन्या तापकीर याची रिक्षा चालवित होते, त्याचा राग मनात धरुन गणपतीची वर्गणी आरोपीच्या एरियामध्ये गोळा करण्याच्या कारणावरुन ओम नरवडे याने लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात मारला. प्रज्वल रोकडे याने हॉकी स्टीकने हातापायावर मारहाण केली. यश नरवडे याने हातामधील काठीने तसेच इतर तिघांनी काठीने मारहाण केली. मानव रोकडे याने त्यांच्याकडील कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारला. तो त्यांनी अडविल्याने त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली. त्यांच्या पँटच्या खिशात गणपती वर्गणीचे १३ हजार रुपये व स्वत:चे ४ हजार रुपये असे १७ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खारगे तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा