Pune Pimpri Chinchwad Crime News | SRA स्किममध्ये आडकाठी आणल्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; चिंचवडमधील घटनेत दोघांना अटक

marhan

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | उसने दिलेले पैसे परत का मागितले तसेच चिंचवड येथील एस आर ए स्किममध्ये (SRA Scheme Chinchwad) आडकाठी आणल्याच्या कारणावरुन दोघांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार (Koyta Attack) करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)

याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police Station) दोघांना अटक केली आहे. तेजस ऊर्फ बबलु दिंगबर शिंदे (वय २९) दीपक राम मोरे (वय ४८, दोघे रा. डबल ट्रि बाय हिलटन हॉटेलचे पाठीमागे, इंदिरानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत नागेश बाबु राठोड (वय ३८, रा. डबल ट्रि बाय हिलटन हॉटेलचे मागे, इंदिरानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना चिंचवडमधील संभाजीनगर (Sambhaji Nagar Chinchwad) येथील साई उद्यानाजवळ शनिवारी रात्री पावणे दहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच वस्तीत राहतात. ते रहात असलेल्या इंदिरानगर येथील एस आर ए स्किम सुरु आहे. त्यामध्ये दीपक मोरे याच्या बहिणीला घर मिळण्यास फिर्यादी हे आडकाठी आणत असल्याचा आरोपींचा समज झाला. तसेच फिर्यादी यांनी आरोपीला उसने पैसे दिले होते. साई उद्यानाजवळ फिर्यादीला आरोपी भेटले तेव्हा फिर्यादीने उसने पैसे परत मागितले. हे कारण तसेच एस आर ए स्किममध्ये आडकाठी आणत असल्याच्या रागातून मोरे याने फिर्यादीस पकडून ठेवले.

तेजस शिंदे याने त्याच्याजवळील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात सपासप वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांचे मनगटाजवळ व तीन वार पाठीवर करण्यात आले. त्यात राठोड हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर दोघांनी हातामधील कोयते हवेमध्ये फिरवून जमलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed