Pune Pimpri Chinchwad Crime News | साफसफाईची बॅग सिक्युरिटी केबीनमध्ये ठेवण्यावरुन वाद; सुरक्षा रक्षकाने तरुणाला लोखंडी रॉडने मारुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | चारचाकी गाड्याची साफसफाई करण्यासाठी लागणार्या साहित्याच्या बॅग सिक्युरिटी केबीनमध्ये ठेवण्यावरुन व पिण्याचे बाटलीतील पाणी पिण्यावरुन झालेल्या वादात सुरक्षा रक्षकाने लोखंडी रॉडने मारहाण करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Kill)
https://www.instagram.com/p/DA8F5YMp2pq
याबाबत विशाल नवनाथ गायकवाड (वय ३३, रा. साईकृपा कॉलनी, तापकीरनगर, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घनसिंग रावत या सुरक्षारक्षकावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भोसरीतील इंद्रायणीनगरमधील साई रेसिडेन्सी सोसायटीत बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घडला. (Attempt To Murder)
https://www.instagram.com/p/DA8EswHp786
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई रेसिडेन्सी या सोसायटीमधील सदस्यांच्या पार्क केलेल्या चार चाकी गाड्या धुण्याचे काम विशाल गायकवाड करतात. गाड्या धुण्यासाठी साफसफाई करण्यासाठी लागणार्या साहित्याची बॅग ते सिक्युरिटी केबीनमध्ये ठेवून गाड्या धुवत असतात. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी बॅग केबीनमध्ये ठेवून ते गाड्या धुवत होते. यावेळी सुरक्षारक्षक घनसिंग रावत हा त्यांच्याजवळ आला. तू तुझी बॅग सिक्युरिटी केबीनमध्ये ठेवायची नाही, (Pune Pimpri Chinchwad Crime News)
असे शिंदे साहेबांनी सांगितले. तसेच माझ्या पाणी पिण्याचे बाटलीमधील पाणी प्यायचे नाही, असे रावत याने त्याला सांगितले. त्यावर त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रावत याने शिवीगाळ करुन तुझा जीवच घेतो, असे म्हणून जमिनीवर पडलेला लोखंडी रॉड उचलून फिर्यादीच्या कपाळावर, डाव्या हातावर, छातीवर मारुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक महाडिक तपास करीत आहेत.
https://www.instagram.com/p/DA8RujVJ0yp
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण