Pune Pimpri Chinchwad Crime News | भारतासाठी उत्पादित नसलेल्या कर्करोगावरील इन्जेक्शन 1 लाख रुपयांना विकत होता ! मेडिकल दुकानदारावर पिंपरी पोलिसांनी केली कारवाई

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | कर्करोगावरील इन्जेक्शन भारतामध्ये विक्रीकरीता बनविले नसतानाही बनावट इन्जेक्शन तयार करुन त्याची विक्री करणार्या मेडिकल दुकानदाराला पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) अटक केली आहे.
https://www.instagram.com/p/DAYJHl5pG3r
श्रीप्रसाद श्रीहरी कुलकर्णी Shriprasad Shrihari Kulkarni (वय ४२, रा. रोहन राधिका अपार्टमेंट, प्रथमेश नगरीजवळ, सनसिटी, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून साडेतीन लाख रुपयांचे इन्जेक्शनचे दोन बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तो या बनावट इन्जेक्शनचे प्रत्येकी एक लाख रुपये घेत होता.
https://www.instagram.com/p/DAYH5WVJzI7
याप्रकरणी महेश विष्णु कांबळे (वय ४२, रा. जनवाडी) यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे परिसरात TAKEDA Pharmaceutical Ltd या कंपनीचे कर्करोग या आजारासाठी वापरले जाणारे Adcetris हे इंजेक्शन भारतामध्ये विक्री करण्यासाठी बनविण्यात आलेले नाही. असे असताना त्याचे बनावटीकरण करुन श्रीप्रसाद कुलकर्णी हा विकत असल्याची माहिती फिर्यादी यांना कंपनीने कळविली. कुलकर्णी हा फक्त ज्यांना कॅन्सर आहे, अशांच तो हे औषध विकतो, असे समजल्यावर त्यांनी एका कर्करोग असलेल्या महिलेला हे इन्जेक्शन मागविण्यास सांगितले.
https://www.instagram.com/p/DAX6p0bJLYo
त्याप्रमाणे तिने कुलकर्णीकडे २ इन्जेक्शन मागविले. प्रत्येकी एक लाख रुपये असे दोन लाख रुपये कुलकर्णी याने घेतल़े. त्याने या महिलेला २ इन्जेक्शन दिले. फिर्यादी यांनी ती कंपनीकडे पाठविली. ती बनावट असल्याचे कंपनीने सांगितले. त्यानंतर त्यांनी ही बाब पिंपरी पोलिसांना सांगितली. त्यानंतर या महिलेने पुन्हा २ इन्जेक्शन मागविली. ती देण्यासाठी तो निरामय हॉस्पिटल येथे आला होता. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून कुलकर्णी याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीची या इन्जेक्शनचे दोन बॉक्स आढळून आले. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे (API Ashok Dongre) अधिक तपास करीत आहेत.
https://www.instagram.com/p/DAXrMhDJ28P
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’