Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात जामिनावर सुटलेल्या क्रिडा शिक्षकाचे विद्यार्थिनीशी पुन्हा अश्लील चाळे; प्राचार्य, ट्रस्टचे अध्यक्षांवरही गुन्हा दाखल

Molestation

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | सहा वर्षांपूर्वी शाळेतील मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने पुन्हा त्याच शाळेतील १२ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचे उघड झाले आहे. निवृत्ती देवराम काळभोर Nivritti Devram Kalbhor (५६. रा. गुरुद्वारा चौक, चिंचवड) असे या क्रीडा शिक्षकाचे नाव आहे. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला मार देईन, अशी धमकी देत होता.

२१ ऑगस्ट रोजी ती स्वच्छतागृहातून ती बाहेर येत असताना त्याने पुन्हा अश्लील वर्तन केले. ही घटना घरी सांगितल्यावर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. निगडी येथील शाळेत २०२२ ते २१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. या शिक्षकासह प्राचार्य, ट्रस्टचा अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

शाळेतीलच अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी काळभोर विरोधात २०१८ मध्ये पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अपिलात उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्याला जामीन मंजूर केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पुन्हा नोकरीत सामावून घेतले. हे लैंगिक अत्याचाराच्या (Sexual Assault) गुन्ह्यांना प्रोत्साहन दिल्यासारखे आहे. त्यामुळे काळभोर याच्यासह प्राचार्य, ट्रस्टचे अध्यक्ष यांच्यावरही गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

निवृत्ती देवराम काळभोर (५६. रा. गुरुद्वारा चौक, चिंचवड) या क्रीडा शिक्षकासह शाळेचे प्राचार्य अशोक सोपान जाधव Ashok Sopan Jadhav (५३. रा. प्राधिकरण चिखली) यांना न्यायालयाने २९ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभीम जाधव Rohidas Balbhim Jadhav (६३ रा. पिंपळे गुरव),
अरविंद अंकुश निकम Arvind Ankush Nikam (३६), गोरख सोपान जाधव Gorakh Sopan Jadhav (५०. दोघे चिखली),
हनुमंत दादा निकम Hanumant Dada Nikam (६५ रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) आणि शुभांगी अशोक जाधव (५०)
यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्यासह लक्ष्मण नामदेव हेंद्रे (Laxman Namdev Hendre)
याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed