Pune Pimpri Chinchwad Crime News | बँकेची बनावट कागदपत्रे तयार करुन गाडीवरील बोजा उतरविला ! ब्लॅक लिस्टमधून गाडी कमी करुन आरटीओची फसवणूक
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | स्टेट बँकेचे कर्ज फेडल्याची बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार करुन गाडी ब्लॅक लिस्टमधून कमी करायला लावून आरटीओची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अमोल रतिकांत सद्रे (वय ४५, रा. रास्ता पेठ) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रितम मोहन शिंदे (सध्या रा. श्रीगणेश हौसिंग सोसायटी, मामुर्डी, देहुरोड) रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पिंपरी चिंचवड प्रादेशिक प्ररिवहन कार्यालयात १५ डिसेबर २०२२ ते १० मे २०२३ दरम्यान घडला (Pimpri RTO).
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम शिंदे याने जग्वार लँड रोव्हर कारसाठी स्टेट बँकेकडून २०१८ मध्ये कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँकेने ही गाडी ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र दिले होते. त्यानुसार आरटीओने ही गाडी ब्लॅक लिस्टमध्ये टाकली होती. आरोपीने स्टेट बँकेची बनावट कागदपत्रे तयार करुन आरटीओ फार्म ३५ वर स्टेट बँकेचे बनावट खोटे शिक्के मारुन ही गाडी ब्लॅक लिस्टमधून कमी करुन घेतली. गाडीवरील स्टेट बँकेचा बोजा कमी करण्यास लावून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय