Pune Pimpri Chinchwad Crime News | दाजीनेच मेव्हणीला मारहाण करुन मंगळसुत्र, रोकड चोरली

Molestation

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | सर्व्हिस रोडने पायी जाणार्‍या मेव्हणीच्या पाठीमागून येऊन दाजीने हाताने मारहाण (Marhan) करुन तिच्याकडील मंगळसुत्र व रोकड जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत शिला सुधीर पोटभरे (वय २२, रा. ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विक्रम चैनसिंग खेडेकर (वय ३५) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ताथवडे येथील श्री नित्यानंद मेहंदळे याच्या फार्म हाऊस जवळून जाणार्‍या रस्त्यावर बुधवारी सकाळी ११ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पतीसह शिर्के कंन्स्ट्रक्शन लेबर कॉलनीत राहतात. त्या मुळच्या बीड जिल्ह्यातील केजच्या राहणार्‍या असून मजुरी करतात. त्यांची लहान बहिण वैशाली खेडेकर ही गेल्या दोन वर्षापासून विक्रम खेडेकर याच्यापासून वेगळी राहत असून विक्रम फिरस्ता आहे.

आरोपी विक्रम खेडेकर हा फियार्दी यांच्या बहिणीचा पती आहे. तो गवंडी काम करतो. फियादी यांना बरे नसल्याने त्या दवाखान्यात जाण्यासाठी सर्व्हिस रोडवरुन जात होत्या. त्यावेळी विक्रम हा पाठीमागून आला.तो दारुच्या नशेत होता. त्याने फिर्यादी यांचा हात धरुन मी गाडी बोलवतो, तू गाडीत बस असे म्हणाला. त्यावर फिर्यादी यांनी कुठ जायचे आहे, असे विचारले. तू गाडीत बस म्हणलं तर गप्प बसायचे, लय मार खाशील असे म्हणून त्याने फिर्यादीला दोन तीन चापट्या मारल्या. यावेळी त्यांच्यात झटापट झाली.
त्यात विक्रम याने फिर्यादीच्या गळ्यातील ४ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र व हातातील ३ हजार रुपये असलेले
पाकीट असा १८ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने ओढून घेतले.
तो फिर्यादीना मारण्याच्या तयारीत असताना त्या तेथून पळून गेल्या. विक्रमही तेथून कोठेतरी निघून गेला.
सहायक पोलीस निरीक्षक ठाकुर तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या

You may have missed