Pune Pimpri Crime News | बँकॉक, म्यानमार येथे सायबर फसवणुकीच्या कॉलसेंटरमध्ये काम करणार्या दोघांसह नवी मुंबईतील बँक खातेधारकाला 2 कोटींच्या फसवणूकीच्या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी केली अटक, 60 लाख रुपये गोठविले
पुणे/ पिंपरी : Pune Pimpri Crime News | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळवुन देण्याच्या आमिषाने २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बँकॉक व म्यानमार येथे सायबर फसवणूकीच्या कॉल सेंटरमध्ये काम केलेले पश्चिम बंगाल व पंजाब येथील दोघांना समावेश आहे. नवी मुंबईत असेच कॉल सेंटर सुरु करण्यासाठी ते आले असल्याचे तपासात उघड झाले आहे.
सुशिल भगवान जुवाटकर Sushil Bhagwan Juwatkar (वय ४२, रा. नेरुळ वेस्ट, नवी मुंबई), पंकज राज कपूर Pankaj Raj Kapoor (वय ३८, रा. नेरुळ, नवी मुंबई मुळ रा. जालंधर, पंजाब) आणि निश्चल टंकबीर बरेयली Nischal Tankbir Bareilly (वय २७, रा. नेरुळ, नवी मुंबई, मुळ रा. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६ मोबाईल, ३ पासपोर्ट, ३ पॉस मशीन, २ लॅपटॉप, २ हार्ड डिस्क, २ क्यु आर कोड स्कॅनर, १२ शिक्के, वेगवेगळ्या २४ बँकांचे अकाऊंट ओपनिंग किट, ५ डेबिट कार्ड असा माल जप्त केला आहे. तसेच ६२ लाख रुपये गोठविण्यात आले आहेत.
शेअर/ आयपीओमध्ये गुंतवणुक केल्यास जास्तीजास्त परतावा मिळवुन देण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाला २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७ रुपयांना गंडा घालण्यात आला होता.
या गुन्ह्यात आरोपींनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यात सव्वा लाख रुपये घेतले होते. हे खाते अरशिल इंडस्ट्रिज प्रा. लि.( Aarshil Industries private Limited) या नावाने नवी मुंबई येथील असल्याची माहिती प्राप्त झाली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करुन पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व पथकाला नवी मुंबईला रवाना केले होते. या पथकाने तुर्भ पोलिसांच्या मदतीने सुशील जुवाटकर याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्याने त्याने व त्याचे साथीदार पंकज कपूर, निश्चल बरेयली व इतर यांच्यासह हे बँक खाते वापरल्याची कबुली दिली. पंकज कपूर व निश्चल टंकबीर बरेयली हे त्याच्याच अरशिल इंडस्ट्रिज या कंपनीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दोघांना पकडले. त्यांनी बँकॉक व म्यानमार येथे जाऊन सायबर फसवणूक करण्याकरीता वापरण्यात येणार्या कॉल सेंटरमध्ये काम केले असल्याचे सांगितले. नवी मुंबई येथे सुशिल जुवाटकर याच्या सांगण्यावरुन नवी कॉल सेंटर चालू करण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यांच्या झडतीत ६ मोबाईल, ३ पासपोर्ट, ३ पॉस मशीन, २ लॅपटॉप, २ हार्ड डिस्क, २ क्यु आर कोड स्कॅनर, १२ शिक्के, वेगवेगळ्या २४ बँकांचे अकाऊंट ओपनिंग किट, ५ डेबिट कार्ड असा माल जप्त केला आहे. फिर्यादीचे ६२ लाख रुपये गोठविण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, सुभाष पाटील, सुरज शिंदे, किरण देवकर, श्रीकांत कबुले, विशाल निचित, सोपान बोधवड, नितेश बिचेवार, दिपाली चव्हाण भाविका प्रधान यांनी केली आहे. सरकारी अभियोक्ता सुरज मोहिते यांनी न्यायालयात बाजु मांडून आरोपींची पोलीस कोठडी मिळवून देण्यास मदत केली.
