Pune Police News | अर्ध्या तासात चार वर्षाच्या मुलीला शोधण्यात पोलिसांना यश; पोलिसांच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक

Pune Police

पुणे : Pune Police News | बालेवाडी (Balewadi) परिसरात चार वर्षांची मुलगी हरविल्याची घटना समोर आली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासाच्या आत मुलीला शोधून कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे. यामुळे चतुःशृंगी पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

बालेवाडी परिसरात राहणार्‍या आकांक्षा संदीप गालफाडे या घरकाम करतात. आकांक्षा नेहमीप्रमाणे सकाळी साडे सात वाजता घरातील सर्व कामे आवरून कामावर निघाल्या. त्यावेळी त्यांची ४ वर्षांची मुलगी अनन्या झोपलेली होती.

मात्र, आकांक्षा ११ वाजता घरी आल्यावर त्यांना अनन्या कुठेच दिसली नाही. आसपासच्या घरांमध्ये चौकशी केली असता, कोणालाही काहीच माहिती नव्हती. त्यामुळे आकांक्षा यांच्या मनात अनेक विचार येऊ लागल्यावर त्यांनी बालेवाडी पोलीस चौकीत (Balewadi Police Chowki) मुलगी हरवल्याची तक्रार केली.

पोलिस उपनिरीक्षक आर.आर. पाटील (PSI R.R. Patil) आणि त्यांच्या टीमने त्वरित आकांक्षा गालफाडे राहत असलेल्या परिसरात अनन्याचा शोध सुरू केला. त्यांना जवळपास एक किलोमीटर अंतरावर अनन्या एका दगडावर बसून रडत असल्याचे आढळले. दरम्यान खेळता-खेळता इथपर्यंत आल्यानंतर माघारी कसे जायचे माहित नसल्याने आपण इथे बसल्याचे तिने आईला सांगितले.

” समाजात आज विविध घटना घडत आहेत. त्यामुळे आपल्याला सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
कोणत्याही चुकीच्या घटना दिसल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे.
आज आम्ही ४ वर्षांच्या मुलीला शोधण्यात यशस्वी झालो, याचे समाधान आहे.
परंतु, पालकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे”,
असे पोलिस उपनिरीक्षक आर.आर. पाटील यांनी आवाहन केले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर आर पाटील,
पोलिस उपनिरीक्षक रहिगुडे, पोलिस अंमलदार साबळे, कपाटे यांनी केली. (Pune Police News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान

You may have missed