Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर – पोलीस आयुक्त अमितेश कुमार
पुणे : Pune Police News | उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून बुलडोझर फिरवून घर जमीनदोस्त केले जाते. गुन्हेगारांची नांगी मोडून काढण्यासाठी योगींचा हा पॅटर्न आता पुण्यात राबविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी ही माहिती दिली. (Pune Police Action On Criminals Illegal Houses)
उत्तर प्रदेशात गंभीर गुन्ह्यामध्ये गुन्हेगार आढळून आला की त्याच्या घराची माहिती काढली जाते. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय घराचे बांधकाम केलेले असेल तर बुलडोझर लावून ते पाडले जाते. देशभरात ही बुलडोझर कारवाई चांगलीच गाजते आहे. पुण्यात गुन्हेगारांनी हद्द केली असल्याने त्यांच्यावर घरातूनच नियंत्रण व्हावे, यासाठी बुलडोझर पॅटर्न राबविण्याचा निर्धार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे.
याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गुन्हेगार बदमाश असतील तर पोलीस शरीफ नाहीत, हे आम्ही दाखवून देणार आहोत. गुन्हेगारांनी त्यांची घरे जर बेकायदेशीरपणे बांधली असेल तर त्या घरांवर बुलडोझर चालविला जाईल. पोलिसांनी याची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. नियमांच्या चौकटीत राहून ही कारवाई करण्यात येणार आहे.
इतके दिवस पोलीस सराईत गुन्हेगाराची केवळ माहिती गोळा करीत होते. तो कोठे राहतो, त्याच्यावर या पूर्वी किती गुन्हे दाखल आहेत. त्याचे साथीदार कोण कोण आहेत, याची माहिती संकलित केली जात असे. आता त्याच्या जोडीला तो राहतो, ते घर कोणाचे आहे. त्याचे की भाड्याचे आहे. त्या घराच्या बांधकामाला महापालिकेची परवानगी आहे की नाही, याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
वनराज आंदेकर याच्या खूनामधील (Vanraj Andekar Murder) गुन्हेगारांपासून या कारवाईची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
सध्या पोलीस दल हे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात मग्न राहणार आहे.
याच काळात पोलीस ही माहिती संकलित करुन ठेवणार आहे.
गणेशोत्सव संपल्यानंतर बुलडोझर कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. गुन्हेगारांची नांगी मोडून काढण्यासाठी हा उपाय केला जाणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा