Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्‍या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार

Tadipar-pune Police

पुणे : Pune Police Tadipari Action | हॉटेल व्यावसायिक व स्थानिक नागरिकांमध्ये दहशत माजवून जबरी चोरी (Robbery Case) करणार्‍या सराईत गुंडाला २ वर्षासाठी पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सौरभ विलास शिंदे (वय २६, रा. फुलगाव, ता. हवेली) असे या गुंडाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav) यांनी तडीपारीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

https://www.instagram.com/reel/DBA2jpoJCg3/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

सौरभ शिंदे हा फुलगाव, तुळापूर, पेरणे फाटा, लोणीकंद परिसरात जबरी चोरी करुन लोकांमध्ये दहशत निर्माण करत होता. तसेच हॉटेल व्यावसायिक स्थानिक नागरीकांना वारंवार त्रास देत होता. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करायला पुढे येत नव्हते.

गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा, या उ्ददेशाने सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू, शुभम सातव यांनी शिंदे याच्यावर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासून तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांना पाठविला. जाधव यांनी प्रस्तावाची छाननी करुन सौरभ शिंदे याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार केले आहे. (Lonikand Police Station)

https://www.instagram.com/p/DBA0znWCVw3

अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सावत यांनी ही कारवाई केली आहे.

https://www.instagram.com/p/DA_PWnFihe5

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed