Pune Rains | शिवाजीनगर, चिंचवड, वडगाव शेरीमध्ये दोन तासात अतिवृष्टी ! शिवाजीनगरमध्ये वर्षातील 18 टक्के पाऊस दोन तासात पडला (Videos)

पुणे : Pune Rains | गेले तीन दिवस परतीचा पाऊस पुणे शहरात धुमाकुळ घालत आहे. बुधवारी त्याने कहर केला. सायंकाळी तीन ते पाच दरम्यान शिवाजीनगर, चिचंवड येथे अतिवृष्टी झाली. या दोन तासात चिंचवड येथे १२७ मिमी तर शिवाजीनगरमध्ये १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वडगाव शेरी येथे ७१, नारायणगाव येथे ५५ मिमी, एनडीए येथे ४२ मिमी, हडपसर येथे ३८ मिमी, भोर येथे ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने पुणे शहरासाठी आज ऑरेंज अर्लट जारी केला होता तर घाट परिसरात रेड अर्लट दिला होता. सकाळी चक्क चांगले ऊन पडले होते. ते पाहून काहींनी हवामान विभागाची सोशल मीडियावर खिल्ली उडविली होती. दुपारनंतर आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हलक्या पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर आकाशात काळ्या ढंगाची इतकी गर्दी झाली की, संपूर्ण काळोख दाटून आला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा वेग इतका होता की काही मिनिटात रस्त्याची तळी झाली. त्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती. साठलेल्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न वाहनचालक करत होते.
जोरदार वारे आणि पाऊस यामुळे शहरात ७ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने त्यात कोणतेही नुकसान झाले नाही.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”