Pune Solapur Highway Accident | पुणे : तीन महिन्यापूर्वी लग्न झाले… एंगेजमेंट अ‍ॅनिवर्सरी साजरी करण्यासाठी हाफ डे घेतला मात्र नियतीने घात केला; ट्रॅक्टरला धडकून तरुणाचा मृत्यू

Pune Solapur Highway Accident

पुणे : Pune Solapur Highway Accident | एंगेजमेंट अॅनिवर्सरी साजरी करण्यासाठी कंपनीत हाफ डे घेऊन दुपारी सुट्टी घेऊन दुचाकीवरुन घरी जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.10) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत (Sortapwadi Phata) वाकडा पूल परिसरात झाला. दुचाकीने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

ऋषिकेश विजय गायकवाड (वय-27 रा. गोसावी वस्ती, उरुळी कांचन) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा मांजरी येतील नामांकित सिरम (Serum Institute of India) या कंपनीत कामाला होता. तर त्याचे वडील टेल्को कंपनीत (Telco Pune) कामाला आहेत. ऋषिकेशचे तीन महिन्यापूर्वी लग्न झाले होते. कामावर तो रोज बसने ये-जा करत होता. मात्र, आज एंगेजमेंट अॅनिवर्सरी साजरी करण्यासाठी त्याने कंपनीतून हाफ डे घेतला. तो आज दुचाकीवरुन कंपनीत आला होता.

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना वाकडा पूल या ठिकाणी उरुळी कांचनच्या बाजूने जात असताना समोर असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये ऋषिकेशच्या डोक्याला व अंगावर गंभीर दुखापत झाली. त्याला लोणी काळभोर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अवघ्या तीन महिन्यापूर्वीच ऋषिकेश याचे लग्न झाले होते. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी असा परिवार आहे. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Pune Solapur Highway Accident)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…