Pune Water Storage | संततधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; पुण्याला महिनाभर पुरेल एवढे पाणी 1 दिवसात जमा
पुणे : Pune Water Storage | धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात (Khadakwasla Dam Reservoir) गेल्या चोवीस तासात १.४५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी पुण्याला महिनाभर पुरेल एवढे आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा १०.१२ टीएमसी झाला आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत (Panshet Dam), टेमघर (Temghar Dam) आणि वरसगाव (Varasgaon Dam) या चारही धरणांतील पाणीसाठा कमी होऊन ३.५० टीएमसी झाला होता. विशेष म्हणजे २ जुलै रोजी खडकवासला धरण प्रकल्पात ४.५५ टीएमसी पाणीसाठा होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि नदी, ओढ्यांमधून धरणात पाणी येऊ लागल्याने जलसाठ्यात वाढ झाली.
७ जुलै रोजी खडकवासला धरण प्रकल्पाचा पाणीसाठा ६.५० टीएमसी झाला होता. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र शुक्रवारपासुन पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसापासुन धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे. शनिवारी सांयकाळी ५ वाजेपर्यत खडकवासला प्रकल्पात ८.६७ टीएमसी पाणीसाठा होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठयात वाढ झाली आहे.
रविवारी सांयकाळी ५ वाजेपर्यत खडकवासला प्रकल्पात १०.१२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात या प्रकल्पातील पाणीसाठा १.४५ टीएमसीने वाढला आहे. या प्रकल्पातील १०.१२ पाणीसाठा शहराला साडेसात महिने पुरेल एवढा आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि
वरसगाव या चारही धरणांतील पाणीसाठा गेल्यावर्षी या तारखेला ८.३४ टिएमसी होता.
यंदा मात्र या तारखेला म्हणजे १४ जुलै रोजी या प्रकल्पातील पाणीसाठा १०.१२ टीएमसी झाला आहे.
गेल्यावर्षीपेक्षा या प्रकल्पात १.४५ टिएमसी पाणीसाठा जास्त आहे.
खडकवासला धरणात आजचा पाऊस ११ मि.मी, उपलब्ध साठा १.१९ टीएमसी
पानशेत धरणात आजचा पाऊस १८ मि.मी ,उपलब्ध साठा ४. ४३ टीएमसी
वरसगाव धरणात आजचा पाऊस १८ मि.मी ,उपलब्ध साठा ३.५८ टीएमसी
टेमघर धरणात आजचा पाऊस ३५ मि.मी, उपलब्ध साठा ०.९१ टीएमसी
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड