Pune Zilla Parishad School | शिष्यवृत्ती परीक्षेत तब्ब्ल 214 शाळांचा शून्य टक्के निकाल; शिक्षण विभागाचा संताप; शिक्षकांवर कारवाईचा बडगा

Pune Zilla Parishad School

पुणे : Pune Zilla Parishad School | पुण्यातील इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालासंदर्भात धक्कादायक बाब समोर आली आहे. सुमारे २१४ शाळांचा निकाल या परीक्षेत शून्य टक्के लागला आहे. राज्य सरकारकडून इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येते. नुकत्याच पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत २०० हून अधिक शाळांना भोपळा मिळाला आहे. यामुळे संतापलेला शिक्षण विभाग अ‍ॅक्शन मोडवर आला असून शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. (Pune ZP School)

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता पाचवीच्या वर्गातील मुला मुलींसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आलेल्या परीक्षेत पुणे जिल्हा परिषदेच्या तब्बल २१४ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या निकालाबाबत शिक्षण विभागात तीव्र संताप पसरला असून संबंधित शिक्षकांविरोधात गंभीर दखल घेतल्याचे समोर आले आहे. (Pune Zilla Parishad School)

राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असते. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत शिकवलेच नाही. त्यामुळे याप्रकरणी शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच समाधानकारक खुलासा न मिळाल्यास संबंधितांची वेतनवाढ रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६२१ इतक्या शाळा आहेत.
त्यापैकी पाचवी इयत्तेच्या ९३२ शाळा आहेत.
या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होणे गरजेचे होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed