Raj Thackeray On Mahayuti – Mahavikas Aghadi | ‘शिंदे-फडणवीसांविरोधातही उमेदवार देणार’, राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले – “महायुती, मविआचे गलिच्छ राजकारण…”

Eknath shinde-raj thackeray-devendra fadnavis

नागपूर : Raj Thackeray On Mahayuti – Mahavikas Aghadi | आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) स्वबळावर लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळं राज्यात मनसे किमान २२५ जागा लढवण्याची शक्यता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे.

महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे गलिच्छ राजकारण सर्वांनी बघितले. ही परिस्थिती मनसेसाठी पोषक आहे. आम्ही सुमारे सव्वा दोनशे जागा विधानसभेत लढणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याही विरोधात आम्ही उमेदवार देणार आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मनसे महायुतीत, महाआघाडीत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीसाठी राज ठाकरे तीन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि इच्छुकांच्या भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) सरकारला फायदा होईल, असे वाटत नाही. लोकांना काम हवे आहे. त्यांना काम द्या. ते फुकट पैसे मागत नाहीत. शेतकरी फुकट वीज मागत नाही, मत पाहिजे म्हणून मोफत देतात. लोकांनी दिलेल्या कराचे पैसे वाटप करीत आहे. असे करून कसे चालणार?”

मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेमुळे यश मिळाले असे नाही. त्याला इतर कारणे असतील. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला. दुसरा महिना कदाचित जाईल. त्यानंतर काय याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांची नक्कल करून योजनेच्या पुढील वाटचालीबद्दल ठाकरे यांनी शंका उपस्थित केली.

सर्वसाधारण दिवाळीनंतर निवडणूक जाहीर होईल, असे वाटते. मात्र, जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत निवडणुकीची खात्री नाही. तरीही आमच्या पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी हा दौरा होत आहे. काही ठिकाणी उमेदवार जाहीर केले, पुढे टप्पा टप्प्याने उमेदवार जाहीर करू असेही राज ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली.
आज जो काही राज्यात राजकीय चिखल झाला आहे
त्याला शरद पवार (Sharad Pawar NCP) हेच जबाबादार असल्याचा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला.

पुलोदची स्थापना झाली तेव्हापासूनच राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मसुद्धा फोडाफोडीतूनच झाला. जातीपातीचे विषही त्यांनीच कालवले.
आता हाच कित्ता सर्वच राजकीय पक्ष गिरवीत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मदत केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी विधानसभेत स्वबळाचा नारा दिला.
त्यामुळं विधानसभेत ‘इंजिन’ ला कितपत फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Raj Thackeray On Mahayuti – Mahavikas Aghadi)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed