Ramdas Kadam On Uddhav Thackeray | ‘आनंद दिघेंच्या अपघाताआधी उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा मागितला होता’, शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य
मुंबई: Ramdas Kadam On Uddhav Thackeray | मागील दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खळबळजनक दावा केला होता. ‘आनंद दिघे (Anand Dighe) यांना मारले गेले आहे. त्यांचा घात झाला आहे. हे सर्व ठाण्याला माहिती आहे’, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
https://www.instagram.com/p/DAgQsNZCg7H
आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान आता रामदास कदम यांनीही मोठा गौप्यस्फोट केला आहे. आनंद दिघेंचा अपघात होण्याच्या काही दिवस आधी ठाकरेंनी दिघेंचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
https://www.instagram.com/p/DAf3hZXCY4k
माध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, “संजय शिरसाटांना काय माहिती आहे, याची मला कल्पना नाही. पण आनंद दिघे आणि मी, आम्ही जवळचे मित्र होतो. १९९५ मध्ये शिवसेनेचे सरकार (Shivsena Govt) आले होते. त्यावेळी आनंद दिघे हे ठाण्याच्या विकास कामांची यादी माझ्याकडे द्यायचे. मी ते मंजूर करून आणायचो. माझ्या हस्ते ते भूमिपूजन करायचे.”
https://www.instagram.com/p/DAfq_C9Cqh0
ते पुढे म्हणाले, “त्यांचा खून कुणी केला, का केला, कसा केला? त्यांचा मृत्यू कसा झाला, ही निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाहीये. ही वेळ नाहीये. मात्र, एवढं मला माहिती आहे की, आनंद दिघेंच्या ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता, हे मला माहिती आहे. त्याच काळामध्ये म्हणजे ज्यावेळी हा अपघात घडला, ते हॉस्पिटलमध्ये भरती होते त्याच आठ दहा दिवसांच्या दरम्यान”, असा दावा कदम यांनी केला आहे.
https://www.instagram.com/p/DAftoa6ijMf
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)