Ramwadi Pune Crime News | पुण्यातही बिहारसारखे कांड ! जेसीबीने घर, गोठे पाडून केली मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करुन महिलेचा विनयभंग करणार्यावर अॅट्रोसिटीखाली गुन्हा
पुणे : Ramwadi Pune Crime News | बिहारमध्ये नुकतेच दलितांची घरे जाळून टाकल्याची धक्कादायक घटना सर्वांसमोर आली होती. तशी घटना पुण्यात झाली असून दलितांची घरे, गोठे, झाडे पाडून टाकण्याचा धक्कादायक प्रकार रामवाडीत घडला आहे.
https://www.instagram.com/p/DAXleTqJepX
याप्रकरणी एका ३९ वर्षाच्या तरुणाने येरवडा पोलिसांकडे (Yerawada Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मारुती मुरलीधर देवकर, दत्ता देवकर, हषी देवकर, बॉबी राठोड, माँटो व १० ते १५ स्त्री पुरुष बाऊंसर (सर्व रा. विमाननगर) यांच्यावर अॅट्रोसिटीसह (Atrocity Act) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रामवाडीतील जय महाराष्ट्र दलित मित्र मंडळ येथे २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
https://www.instagram.com/p/DAXjsR2zQli
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचे राहते घरासमोरील जुने घर व गोठा आहे. तेथे जाण्याकरीता असलेल्या रस्त्यावर आरोपी हे जबरदस्तीने पत्रा लावत होते. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी प्रतिकार केला असता मारुती देवकर याने फिर्यादी यांच्याकडे पाहून जातीवाचक शिवीगाळ केली. ‘‘गावाकुशीबाहेर राहणारी लोक तुम्ही, आमची बरोबरी करता का?’’असे म्हणून जेसीबीच्या सहाय्याने तेथे असलेले बाळू माने, अशोक साळवे, तानाजी केंदळे यांचे व फिर्यादी यांचे घर, गोठे तसेच गोठ्याजवळील बाभळ व वडाचे झाड पाडले. यावेळी तेथे आणलेल्या महिला बाऊंसर तसेच इतरांनी फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांना हाताने व लाठीने मारहाण केली. फिर्यादीच्या आईला अश्लिल बोलून तिचा विनयभंग (Molestation Case) केला. या प्रकरणी पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त सोनवणे तपास करीत आहेत. (Ramwadi Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DAWIGC6C0UN/?img_index=1
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”