RBI On Two Thousand Rupee Notes | खुशखबर ! दोन हजारांच्या नोटा पोस्टामार्फत आरबीआयकडे (RBI) जमा करण्याची सुविधा
पुणे : RBI On Two Thousand Rupee Notes | दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आता त्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या सुधारित निर्देशानुसार पोस्ट ऑफिसमार्फत आरबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे अजूनही दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना त्या बदलून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. आता, या नोटा पोस्ट ऑफिसमार्फत स्वीकारून रिझर्व्ह बँकेकडे जमा केल्या जाणार आहेत. टपाल विभागाने नागरिकांना नोटा बदलण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
नोटा बदलण्याची प्रक्रिया:
ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांमध्ये पाठविण्याची सुविधा पोस्ट ऑफिसच्या काउंटरवर उपलब्ध आहे. ग्राहकांनी या नोटा स्पीड पोस्ट (विमा कव्हर) पत्राद्वारे पाठवाव्यात. आवश्यक फॉर्म पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे, तो भरून नोटांचा तपशील, दोन हजार रुपयांच्या नोटा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून स्पीड पोस्टद्वारे पाठवाव्यात.
बी. पी. एरंडे, अधीक्षक, पुणे ग्रामीण डाक विभाग
रिझर्व्ह बँकेच्या शाखेचा पत्ता:- उपमहाव्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इशू डिपार्टमेंट, प्लॉट नंबर 3,
सेक्टर क्रमांक 10, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई, 400614. (RBI On Two Thousand Rupee Notes)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे