RMD Foundation News | कुडाची (बेळगांव, कर्नाटक) येथील ‘शोभाताई आर धारीवाल’ इंग्रजी शाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न

RMD Foundation

पुणे : RMD Foundation News | कुडाची (बेळगांव, कर्नाटक) येथील ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असे याबाबत शांतीसागर वेल्फेअर सोसायटीचे (Shantisagar Social Welfare Society’s) अध्यक्ष व पदाधिकारी यांनी आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल (Shobhatai R. Dhariwal) यांची भेट घेऊन इंग्रजी शाळा निर्माण करण्याची विनंती केली होती. त्यानुसार इंग्रजी हायस्कूल इमारत तयार करून काल या शाळेचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी शाळेचे विश्वस्त, विध्यार्थी, पालकवर्ग, स्थानिक नेतेमंडळी, युवावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. इंग्रजी शाळेची गावातच सोय झाल्याने पालकवर्ग व विद्यार्थी आनंदात होते . सर्वांनी आर एम डी फाऊंडेशन चे आभार मानले.

याप्रसंगी आर एम डी फाऊंडेशन द्वारा आरोग्य शिक्षण, क्रीडा, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात भारतभर भरीव कार्य केले आहे आणि आजही निरंतर चालूच आहे. यामध्ये दरवर्षी रसिकलाल एम धारीवाल यांच्या जन्मदिनी कोरेगाव पार्क येथे 1 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन, वर्षभर चालणारे वृक्षारोपण तसेच “एक झाड आईच्या नावाने-वृक्षारोपण व संवर्धन” योजना, ग्रामीण ,शहरी आणि आदिवासी भागात विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान प्राप्त व्हावे याकरिता ‘शोभाताई स्मार्ट क्लास योजना’ अंतर्गत स्मार्ट बोर्डचे वाटप , पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिक बॅग ऐवजी कागदी बॅग वापरावे बाबत विद्यार्थ्यांमध्ये जन जागृती व कागदी बॅग बनविण्याचे प्रशिक्षण, विविध देवस्थान, शाळा महाविद्यालये , सार्वजनिक उद्यानं, शासकीय रुग्णालय इत्यादी ठिकाणी येणाऱ्या लोकांना “प्याऊ” च्या माध्यमातून शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे,

रांजणगाव गणपती येथे “मॅरेथॉन”. विदर्भात “शोभाताई आर धारीवाल उद्योग नगरी” च्या माध्यमातून निराधार, आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना रोजगार निर्मिती, निमगांव -माढा सोलापूर येथे शेतकऱ्यांना वर्षभर शेतीवरील प्रशिक्षणासाठी अद्यावत “सौ शोभाताई शेतकी प्रशिक्षण केंद्र (मुक्तांगण )” निर्मिती तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असल्याची माहिती आर एम डी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन (Janhavi Dhariwal Balan) यांनी दिली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा

You may have missed