Hindu Garjana Chashak | हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा ! (Videos)

Hindu Garjana Chashak

कोल्हापुरच्या शुभम शिदनाळे व अपेक्षा पाटील; हवेलीच्या सुरज चोरघे यांनी पटकावले विजेतेपद !!

पुणे : Hindu Garjana Chashak | हिंदू गर्जना प्रतिष्ठान (Hindu Garjana Pratishthan) आणि पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group – PBG) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटामध्ये कोल्हापुरच्या शुभम शिदनाळे (Shubham Shidnale) याने तर, कुमार गटामध्ये हवेली सुरज चोरघे (Suraj Chorghe) तसेच महिला गटामध्ये कोल्हापुरच्या अपेक्षा पाटील (Apeksha Patil) यांनी विजेतेपद संपादन करून मानाची चांदीची गदा पटकावली.

https://www.instagram.com/p/DF4W90oJvBF

टिळक रोड येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर तयार करण्यात आलेल्या स्व. धनंजय रामचंद्र घाटे क्रीडानगरीमध्ये झालेल्या स्पर्धेच्या खुल्या गटाच्या अंतिम फेरीमध्ये शुभम याने उपांत्य फेरीमध्ये गतवेळचा महाराष्ट्र केसरी याचा सिकंदर शेख याचा ६-२ अशा गुणफरकाने पराभव करून मुळशीच्या तानाजी झुंझुरगे समोर आपले आव्हान निर्माण केले होते. अंतिम सामना हा निकाली कुस्ती घेण्यात येणार असल्याने दोन्ही कुस्तीपटूंनी सुमारे तासभर (५२ मिनिटे) जोरदार खेळ करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सहा मिनिटांची गुणांची लढत खेळण्याचा निर्णय पंचांनी घेतला. तासभर दमल्यानंतर लढल्या गेलेल्या कुस्तीमध्ये शुभमने आपल्या आडदांड शरीरयष्टीच्या जोरावर तानाजीचा १०-१ अशा गुणफरकाने सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

https://www.instagram.com/p/DF4UlcqJGv1

१७ वर्षाखालील कुमार खुला गटामध्ये हवेलीच्या सुरज चोरघे याने आपलाच संघसहकारी आणि तालिमीतील दोस्त रोहीत दिघे याचा १३-२ असा सहज पराभव केला. विजयानंतर रोहीत याने वेदांत याला आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन स्टेडियमला विजयी प्रदक्षिणा घातली तेव्हा उपस्थित क्रीडाप्रेमींनी रोहीत आणि वेदांत याच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले. महिलांच्या खुल्या गटामध्ये कोल्हापुरच्या अपेक्षा पाटील हिने पिंपरी-चिंचवडच्या प्रगती गायकवाड हिचा ३-२ असा निसटता पराभव करून विजेतेपदाला गवणसी घातली.

https://www.instagram.com/reel/DFz6mXlpva8/?utm_source=ig_embed&ig_rid=3aff70bc-32d5-493a-828e-eb75bc3b3829

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य नगरविकास, परिवहन, सामनाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री आ. माधुरी सतीश मिसाळ (Madhuri Misal), आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), सिनेअभिनेता अंकुश चौधरी, माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालिका जानव्ही धारीवाल-बालन (Janhavi Dhariwal Balan), स्पर्धेचे आयोजक पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे (Dheeraj Ghate) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS), कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने, तसेच हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.

खुल्या गटातील विजेता शुभम शिदनाळे याला चांदीची गदा, २ लाख ५१ हजार रूपये, महिंद्रा थार मोटारकार आणि स्मृतीचिन्ह तर, उपविजेत्या तानाजी झुंझुरगे याला १ लाख ५१ हजार रूपये आणि स्मृतीचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्या सोलापुरच्या प्रमोद सुळ याला १ लाख ५१ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. खुल्या गटातील महिला विजेता ठरलेल्या कोल्हापुरच्या अपेक्षा पाटील हिला २ लाख ५१ हजार रूपये, ई-बाईक आणि चांदीची गदा, उपविजेता ठरलेल्या प्रगती गायकवाड आणि तृतीय क्रमांच्या वेदीका सासणे यांनना १ लाख आणि ५१ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. कुमार गटातील विजेत्या सुरज चोरघे याला चांदीची गदा आणि १ लाख रूपयांचे पारितोषिक, तसेच १७ आणि १४ वर्षाखालील गटातील विजेत्यांना सायकल आणि २५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. (Hindu Garjana Chashak)

स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम निकालः (प्रथम, व्दितीय, तृतीय या क्रमानुसार)ः
१७ वर्षाखालील कुमार खुला गटः सुरज चोरघे (हवेली); रोहीत दिघे (हवेली); वेदांत झुंझुरके (मुळशी);

https://www.instagram.com/p/DF4aiaatnXV/?img_index=1

महिला गटः

५३ किलोः ज्ञानेश्वरी पायगुडे (पुणे); सुहानी चोरघे (इंदापूर); दिशा पवार (पुणे जि.);
५७ किलोः अहिल्या शिंदे (इंदापूर); वैष्णवी तोरवे (पुणे जि.); सिद्धी ढमढेरे (पुणे जि.);
६२ किलोः आकांक्षा जाधव (पुणे); अनुष्का भालेकर (पिंपरी-चिंचवड); ऋतुजा गाढवे (पुणे जि.);
६५ किलोः रोशनी बोडखे (इंदापूर); विशाखा चव्हाण (पुण जि.); सावनी सातकर (मावळ);
खुला गटः अपेक्षा पाटील (कोल्हापुर); प्रगती गायकवाड (पिंपरी-चिंचवड); वेदीका सासणे (कोल्हापुर);

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा

You may have missed