Rohit Pawar On Ajit Pawar | “दिल्लीवरून फर्मान आलं असावं, आता…”, रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले – ” राज्यात तिसरी आघाडी बनवून…”
दिल्ली : Rohit Pawar On Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सुरु झालेली आहे. दरम्यान विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध आरोपांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Lakdi Bahin Yojana) अजित पवार गुलाबी यात्रेत माझी लाडकी बहिण योजना करतात. त्याच यात्रेत अजितदादा वेगळी भूमिका घेत आहेत.
आंदोलनाला सुरुवात होत आहे त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यात मनसेही येऊ शकते. त्यात अजून पक्षसोबत येतील. या सर्वांचे काम सुपारी घेऊन महाविकास आघाडीची मते खायची हेच काम असेल”, असा दावा आमदार रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
रोहित पवार म्हणाले, दिल्लीवरून फर्मान आलं असावं, आता आपलं कुठलंच गणित बसेना, महायुतीला कुठेच आकडे मिळेना. तर मग तिसरी आघाडी काढू. अजित पवार आणि त्यांचा पक्ष त्यासाठी पुढाकार घेईल. त्याला मनसे आणि इतर पक्ष जोडले जातील.
या तिसऱ्या आघाडीचं काम शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मते खायची इतकेच असणार आहे. निवडून आले नाही तरी चालेल पण मते खायची. त्याची सुरुवात आज अजित पवारांच्या आंदोलनापासून झाली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच तुमचे लोक पैसा खाण्यासाठी एकत्र आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही वेगळी भूमिका घेत असाल तर कदाचित तिसऱ्या आघाडीची सुरुवात झाली असं बोलावे लागेल. आज आंदोलन केले, उद्या भाजपाविरोधात बोललं जाईल. मग हळूहळू आम्हाला इतक्याच जागा हव्यात, १०० जागा हव्यात मग भाजपा म्हणणार २० जागा देतो. मग त्यातून ते वेगळे होतील आणि इतर २-३ पक्षांना घेऊन सुपारीबाज पक्षांची संघटना होईल आणि ती आघाडी मते खाण्यासाठीच होईल अशी चर्चा होईल.
भाजपा हुशार आहे. दिल्लीत बसून समीकरण बनवतात. असेच समीकरण लोकसभेला केले.
काही पक्षांना वेगळे उभे केले. परंतु २०१९ एवढी मते त्यांना मिळाली नाहीत.
महाराष्ट्राच्या लोकांना भाजपाची स्ट्रॅटर्जी कळाली आहे. त्यामुळे किती आघाडी उघडली तरी त्यांना यश येणार नाही असं त्यांनी म्हटलं.
ते पुढे म्हणाले, दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तिथे अजित पवारांनी माफी मागितली हे चांगली बाब.
परंतु आम्ही ६ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा काढला त्यात माफी मागता येत नाही.
बदलापूरला जिथं लहान मुलींवर अन्याय झाला, महिलांवर अत्याचार होतायेत तिथे माफी मागता येत नाही.
तुमचे मित्रपक्ष भाजपा थोर व्यक्तींवर बोलतात तिथे तुम्ही काही बोलत नाही.
एमआयडीसीत जो भ्रष्टाचार होतो तिथे तुम्हाला माफी मागता येत नाही.
हिंमत असेल तर ज्या चुका महायुती सरकारने केल्या त्याबाबत अजित पवारांनी उघडपणे सभा घ्याव्यात,
असा इशारा त्यांनी अजित पवारांना दिला. (Rohit Pawar On Ajit Pawar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा