Rupali Patil Thombare Vs Rupali Chakankar | ‘एकाच महिलेला किती पदे देणार’, चाकणकरांच्या आमदारकीच्या चर्चेवरून रुपाली पाटलांची नाराजी; राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
पुणे : Rupali Patil Thombare Vs Rupali Chakankar | विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. या १२ मध्ये भाजपला ६, शिंदे सेनेला ३, तर अजित पवार (Ajit Pawar NCP) गटाला ३ जागा मिळणार असल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालांकडे ती मान्यतेसाठी पाठविली जाणार आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला आलेल्या तीन जागांवरील नावे निश्चित केल्याची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
त्यावरून आता पक्षातीलच नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्षेप घेतला आहे. रुपाली पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ या न्यायानुसार आमचे अजित पवार हे न्याय नक्की देतील असा विश्वास आहे.
एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे, बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले.
पक्षाला कळकळीची विनंती की, राष्ट्रवादीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने,दमदार कामाने मोठ्या आहेत.
पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत. त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा, इतर महिलांना समान संधी द्यावी,
असे म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाकडे विनंती केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा