Sahakar Nagar Pune Crime News | मोबाईल कंपनीचे टॉवरवरील महागड्या रिमोट रेडिओ युनिटची चोरी करणारा जेरबंद; 5 लाख 70 हजारांचा माल, सहकारनगर पोलिसांची कामगिरी

Sahakar Nagar Police

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | मोबाईल कंपनींच्या टॉवरवरील महागड्या रिमोट रेडिओ युनिटची चोरी करणार्‍या दोघांना सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) अटक केली होती. त्यांच्या साथीदाराला पकडून त्याच्याकडून ५ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. (Arrest In Theft Case)

दिलशाद मोहमद रफिक (वय ३२, रा. कुलउत्सव सोसायटी, खडी मशीन चौक, कोंढवा, मुळ रा. उत्तर प्रदेश) असे तिसर्‍या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल कंपनीने धनकवडीतील संभाजीनगर येथील केदार अपार्टमेंट व साईकृपा सोसायटी येथे मोबाईल टॉवर बसवले होते. या टॉवरवर एका कंपनीने ४ जी नेटवर्कसाठी रिमोट रेडिओ युनिट असे एकूण ९ नग मशीन बसविल्या होत्या. चोरट्यांनी त्या चोरुन नेल्या होत्या. या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी अक्षय शांताराम बोडके (वय २६, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि अशिष अशोक शिंदे (वय ३९, रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) यांना अटक केली होती. (Sahakar Nagar Pune Crime News)

सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक दही हंडीनिमित्त (Dahi Handi 2024) मंगळवारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर यांना बातमी मिळाली की, मोबाईल टॉवरवरील किंमती मशीन चोरी करणारा एक जण के. के. मार्केटच्या पुढे भंगार दुकानाजवळ चोरीच्या रिमोट रेडिओ मशीन पोत्यात घेऊन विक्रीसाठी येणार आहे. ही बातमी मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तेथे जाऊन दिलशाह रफिक याला पकडले. त्याने साथीदार अक्षय बोडके, अशिष शिंदे यांच्यासह गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ५ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (PravinKumar Patil IPS),
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (Smartana Patil IPS), सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी (ACP Nandini Vagyani),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे (PI Chhagan Kapse) , पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे (PI Uttam Bhajanawale)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील (API Sagar Patil),
सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड , पोलीस अंमलदार सागर सुतकर, खंडु शिंदे, अमोल पवार, किरण कांबळे,
बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, सागर कुंभार, अमित पदमाळे, विशाल वाघ यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान

You may have missed